Home Loan Tips : होम लोन घेण्याचा विचार करताय ? फक्त व्याजदर नाही तर या गोष्टी देखील लक्षात ठेवा !

Is It a Good Idea To Get a Home Loan : घर खरेदी करताना आपण अशा अनेक चुका करतो ज्यामुळे आपल्या अनेक समस्यांना सामोरे जावे लागते.
Home Loan Tips
Home Loan TipsSaam Tv
Published On

First Time Borrower Loan : हल्ली मुंबईसारख्या शहरात स्वत:चे घर असावे असे प्रत्येकाला वाटत असते. परंतु, महागाईमुळे घराच्या किंमती या गगनाला भिडल्या आहेत. ज्यामुळे सर्वसामान्यांना घर खरेदी करताना तारेवरची कसरत करावी लागते.

परंतु, घर खरेदी करताना आपण अशा अनेक चुका करतो ज्यामुळे आपल्या अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. आजच्या काळात घर खरेदी करण्यासाठी अनेक लोक लोन घेण्याचा विचार करतात. ज्यासाठी ते फक्त व्याजदर पाहणे पुरेसे नाही. तुम्ही पहिल्यांदाच होम लोन घेणार असाल तर या गोष्टी देखील लक्षात ठेवा

Home Loan Tips
Home Loan Hidden Charges : गृह कर्जावर बँक का आकाराते अधिक शुल्क ? या हिडन चार्जेसबद्दल तुम्हाला माहित आहे का ?

1. आर्थिक स्थिती

गृहकर्ज घेण्यापूर्वी आपल्याला डाउन (Down) पेमेंट देखील करावे लागते. त्यासाठी उत्पनाच्या एकूण किमतीच्या 10 टक्के ते 25 टक्के असू शकते. तसेच, कर्ज घेतल्यानंतर, दर महिन्याला तुमचा मासिक हप्ता सुरू होईल, जो दीर्घकाळ चालेल. अशा परिस्थितीत तुम्ही स्वतःची आर्थिक (Money) स्थिती एकदा नीट पाहावी. जेणेकरून नंतर तुम्हाला कोणत्याही प्रकारचा त्रास सहन करावा लागणार नाही.

2. कर्जाची रक्कम किती असायला हवी ?

कर्ज (Loan) घेण्यापूर्वी, सर्व गरजा लक्षात घेऊन तुम्ही किती हप्ता सहज भरू शकता हे तपासा. त्यानंतरच तुम्ही किती कर्ज घ्यायचे हे ठरवा. लक्षात ठेवा की, तुमचा ईएमआय हा पगाराच्या ४० टक्के पेक्षा जास्त नसावा.

Home Loan Tips
Shirya Saran : दाक्षिणात्य ब्युटी समोर सारेच फिके !

3. क्रेडिट स्कोअर किती असावा ?

कर्ज घेताना तुमचा क्रेडिट (Credit) स्कोअर चांगला असावा. यामुळे तुम्हाला कर्ज लगेच मिळते. बर्‍याच वेळा चांगल्या क्रेडिट स्कोअरवर चांगल्या व्याजदरावर कर्ज देखील उपलब्ध होते. याशिवाय वेगवेगळ्या बँकांचे व्याजदर, कर्जाची रक्कम, एलटीव्ही प्रमाण, कर्जाचा कालावधी आणि प्रक्रिया शुल्क यामध्ये फरक असतो. अशा परिस्थितीत, लोन घेण्यापूर्वी बँक आपल्या क्रेडिट स्कोअरला लक्षात घेते व त्यानुसार लोन देते.

4. अधिक डाउन पेमेंट भरण्याचे फायदे

जर तुमची आर्थिक स्थिती चांगली असेल तर होम लोनसाठी अधिक डाउन पेमेंट भरा. यामुळे तुम्हाचे लोन मंजूर होण्याची शक्यता अधिक वाढते. काही बँका व्याजदर देताना LTV प्रमाण निवडतात. परंतु जास्त डाउन पेमेंट देण्यासाठी तुमचे साठवलेले पैसे वापरु नका.

Home Loan Tips
Priya Bapat : फुलपाखरु छान किती दिसते !

5. हा आपत्कालीन निधी असावा

जर तुम्ही कर्जासाठी अर्ज करणार असाल तर तुमच्याकडे इमर्जन्सी फंड नक्कीच ठेवा. हे तुमच्या 6 महिन्यांच्या EMI हप्त्यांइतके असावे. काहीवेळा नोकरी गमावल्यामुळे किंवा इतर कोणत्याही परिस्थितीमुळे ईएमआयची परतफेड करणे कठीण होते. यामुळे दंड होऊ शकतो, तसेच तुमच्या क्रेडिट स्कोअरचे नुकसान होऊ शकते. अशावेळी तुमचा आपत्कालीन निधी कामी येतो.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com