PAN Card Saam Tv
बिझनेस

PAN 2.0: आता PAN 2.0 येणार थेट तुमच्या ई-मेलवर; फक्त ही प्रोसेस करा फॉलो

PAN 2.0 Process: नुकतंच सरकारने पॅन कार्ड २.० ची घोषणा केली आहे. आता पॅन कार्ड थेट तुमच्या ई-मेलवर येणार आहे. त्यासाठी या स्टेप्स फॉलो करा.

Siddhi Hande

केंद्र सरकारने PAN 2.0 ची घोषणा केली आहे. या पॅन २.० ची घोषणा केल्यानंतर अनेकांच्या मनात प्रश्न निर्माण झाले आहेत. नवीन पॅन कार्ड बनवल्यावर जुन्या पॅन कार्डचं काय होणार? नवीन पॅन कार्ड काढण्याची प्रोसेस काय असे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. आज आम्ही तुम्हाला या सर्व प्रश्नांची उत्तरे देणार आहोत.

आता तुम्हाला नवीन PAN 2.0 हे ई-मेलवर मिळणार आहे. त्यामुळे तुम्हाला कोणत्याही प्रकारचे ऑफलाइन काम करण्याची गरज पडणार नाही. परंतु तुम्हाला जर फिजिकल पॅन कार्ड हवे असेल तर ५० रुपये भरावे लागतील. त्याचसोबत परदेशात डिलिव्हरी करण्यासाठी इतका खर्च येणार आहे.

PAN 2.0 योजना अजूनपर्यंत सुरु झाली नाही परंतु तुमचे नवीन पॅन कार्ड ई-मेल आयडीवर येण्याची शक्यता आहे. जर इमेल आयडी तुमच्या आयकर डेटाबेसमध्ये रजिस्टर नसेल तर पॅन कार्ड मोफतदेखील अपडेट करु शकतात.

E-PAN Card कसं डाउनलोड करायचं? (How To Download Pan Card)

सर्वप्रथम NDSL च्या वेबसाइटवर जा.

त्यानंतर पॅन, आधार कार्ड नंबर आणि जन्मतारीख टाकावी.

यानंतर आवश्यक माहिती भरावी, त्यानंतर चेकबॉक्सवर टिक करुन फॉर्म सबमिट करावा.

यानंतर तुमची माहिती वेरिफाय झाल्यावर तुमच्या रजिस्टर मोबाईल नंबरवर ओटीपी येईल.

त्यानंतर पेमेंटच्या ऑप्शनवर क्लिक करा.

यानंतर तुमचे ई- पॅन कार्ड ई-मेलव पाठवण्यात येईल.

तुमच्या ई-मेलवर पॅन कार्ड ३० मिनिटांत मिळणार आहे. जर तुम्हाला पॅन कार्ड मिळाले नसेल तर तुम्ही tininfo@proteantech.in या ई-मेलवर मेसेज करु शकतात. किंवा 020-27218080/81 या नंबरवर संपर्क साधावा. यामुळे तुम्हाला तुमच्या पॅन कार्डबाबत सर्व माहिती मिळेल.

नवीन PAN 2.0 काय आहे? (What Is Pan 2.0)

PAN 2.0 या योजनेतून पॅन कार्ड अपडेट केले जाणार आहे. तुमच्या पॅन कार्डवर क्यू आर कोड दिला जाणार आहे. हा क्यू आर कोड स्कॅन केल्यावर तुम्हाला तुमची सर्व माहिती एका क्लिकवर मिळणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Thackeray Family Reunites : अभूतपूर्व ऐतिहासिक क्षण! राज- उद्धव ठाकरे यांचं संपूर्ण कुटुंब एकत्र | पाहा VIDEO

Maharashtra Live News Update: केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते लोकार्पण आणि उद्घाटन सोहळा

Sara Ali Khan: पतौडीच्या राजकुमारीचे क्यूट बार्बी डॉल लूक पाहिलेत का?

Mental Health: तुमची मानसिक स्थिती बदलत आहे का? 'या' ५ लक्षणांवर लक्ष ठेवा

Ladki Bahin Yojana : 'पोर्टल बंद, नव्या नोंदणी होणार नाहीत'; उद्धव ठाकरेंनी लाडक्या बहिणींचं भविष्यच सांगितलं

SCROLL FOR NEXT