Viral Video :गाणं आवडलं तर पैसे उडवू नका, क्यू आर कोड स्कॅन करा; डीजिटल जुगाड व्हायरल

Viral News : एका ढोल वादकाचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
Viral Video
Viral VideoSaam Tv
Published On

Viral Video

सध्या सणासुदीचे दिवस सुरू आहेत. सणासुदीच्या दिवसात खर्चही मोठ्या प्रमाणात होत आहे. परंतु हा खर्च करताना सध्या कॅशलेस व्यव्हार होत आहेत. सर्वजण गुगल पे, किंवा क्यू आरचा वापर करुन पेमेंट करतात. परंतु आता चक्क ढोलवादकानेच क्यू आरचा पर्याय लोकांसाठी ठेवला आहे.

आजकाल आपण भाजी घ्यायला किंवा टपरीवर चहा प्यायला गेलो तरी तिथे क्यू आर कोड वापरुन डिजिटल पेमेंटचा पर्याय असतो. त्यामुळे आता रोख रक्कम ठेवण्याची गरज भासत नाही. त्यातच आता चक्क ढोल वादकाने क्यू आर कोड ठेवला आहे. याचा फोटो सध्या व्हायरल होत आहे.

Viral Video
Chaleya Viral Video: ‘जवान’ची भुरळ पाकिस्तानी अभिनेत्रीलाही, ‘चलेया’ गाण्यावर केला अफलातून डान्स; VIDEO व्हायरल

सणासुदीत, लग्नसमारंभात ढोल-ताशे, बँड बाजा हमखास वाजवले जातात. या ढोल ताशांवर नाचताना लोक आनंदाने ढोल-ताशा वादकांना पैसे देतात. त्यांच्या ढोलच्या तालावर ठेका धरतात. असाच आता एका ढोल वादकाचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. आता तुम्ही म्हणाल ढोल ताशांचे अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. परंतु हा ढोल वादक डिजिटल आहे. तो डिजिटल पद्धतीने लोकांकडून पैसे घेत आहे.

एक्स या प्लॅटफॉर्मवर एका युजरने या डिजिटल ढोल वादकाचा फोटो शेअर केला आहे. विशेष म्हणजे, हा ढोल वादक आपल्या ढोलवर क्यू आर कोड घेऊन फिरत आहे. लोक नाचता नाचता पैसे देतात.परंतु सध्या लोक कॅश न ठेवता डिजिटल पेमेंटचा जास्त वापर करतात. त्याचाच विचार करुन या ढोल वादकाने क्यू आर कोड ठेवला आहे.

या फोटोत एक वादकाने फोनचा क्यू आर कोड ठेवला आहे. त्यामुळे लोकांना पैसे देण्यास सोपे जावे. सोशल मीडियावर हा फोटो प्रचंड व्हायरल होत आहे. या फोटोवर अनेकांनी कमेंट्स केल्या आहे.

Viral Video
Ukhana Viral Video: काकींचा उखाणा एकच नंबर; अर्ध इंग्लिश आणि अर्ध मराठी ऐकून नेटकरी लोटपोट हसले

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com