Ukhana Viral Video: काकींचा उखाणा एकच नंबर; अर्ध इंग्लिश आणि अर्ध मराठी ऐकून नेटकरी लोटपोट हसले

Viral Video: सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडीओत काकूंना उखाणा घ्यायला सांगितला, तेव्हा त्यांनी भारताची प्रतिज्ञा इंग्रजीमध्ये बोलत उखाणा घेतला.
Pledge India Is My Country Funny Ukhana Video
Pledge India Is My Country Funny Ukhana VideoInstagram
Published On

Pledge India Is My Country Funny Ukhana Video

सोशल मीडियावर कायमच अनेक भन्नाट व्हिडीओ व्हायरल होत असतात. अनेकदा सहज केलेली कलाकृती त्या व्यक्तीला एका वेगळ्याच उंचीवर नेते. कायमच सोशल मीडियावर वेगवेळ्या विषयांवरील व्हिडीओ प्रचंड व्हायरल होतात.

गेल्या काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर एक महिला उखाणा घेत असल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. लग्नाचा सीझन आला की, सोशल मीडियावर अनेक व्हिडीओ व्हायरल होतात. पण आता सध्या या व्हिडीओने नेटकऱ्यांचे लक्ष वेधले आहे. ज्यावेळी काकूंना उखाणा घ्यायला सांगितला, तेव्हा त्यांनी भारताची प्रतिज्ञा इंग्रजीमध्ये बोलत उखाणा घेतला.

Pledge India Is My Country Funny Ukhana Video
Jigri Announcement: ‘रॉकी और रानी...’ नंतर आलियाची नवा चित्रपट, ‘जिगरी’मध्ये साकारणार महत्वाची जबाबदारी

सध्या हा व्हिडीओ नेटकऱ्यांच्या बराच पसंदीस पडला आहे. सध्या लग्नाचा सीझन नसला तरी, प्रत्येकाच्या मोबाईलमध्ये आपल्याला हा व्हिडीओ पाहायला मिळेल. हे नक्की... हा जबरदस्त उखाणा athvani_tuzya_mazya या अकाउंटवरुन शेअर करण्यात आला आहे. या शेअर करण्यात आलेल्या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी भन्नाट कमेंट करत लाईक्सचा वर्षाव केला आहे. या व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये काही महिलांचा आणि मुलींचा घोळका दिसून येत आहे. तिथल्या सर्व महिला त्यांना उखाणा घ्यायला सांगतात. (Viral Video)

पुढे व्हायरल व्हिडीओत, काकूंनी इंग्रजी भाषेमध्ये, भारताची प्रतिज्ञा म्हणायला सुरुवात केली. तोच तिथल्या सर्व महिला एकमेकींकडे पाहू लागल्या. काकींचा हा उखाणा ऐकून सर्वच पोटधरुन हसतात. काकू उखाण्यात म्हणतात, “इंडिया इज माय कंट्री, ऑल इंडियन्स आर माय ब्रदर्स अँड सिस्टर…ओन्ली वन ज्ञानदेव इज माय मिस्टर” हा उखाणा सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. तिथल्या उपस्थित सर्व महिला आणि मुलींनी उखाणा ऐकून जोरजोरात टाळ्या वाजवताना आणि हसताना व्हिडीओत दिसत आहे.

Pledge India Is My Country Funny Ukhana Video
Kangana Ranaut Wedding: परिणीती चोप्रानंतर आता कंगना रनौत अडकणार विवाहबंधनात?, या अभिनेत्याने ट्वीट करत केला दावा

उखाणा खरंतर कायमच काही स्पेशल इव्हेंट असेल तर, महिला आवर्जुन घेतात. उखाणा हा खरंतर एक महाराष्ट्राच्या संस्कृतीचा अविभाज्य घटक आहे. कोणत्याही शुभकार्यात महिला काव्यमय पद्धतीत किंवा विनोदी पद्धतीत उखाणा घेतात. पण या काकींचा अर्धा मराठी आणि अर्धा इंग्रजी भाषेतला हा उखाणा प्रचंड चर्चेत आला आहे.

Pledge India Is My Country Funny Ukhana Video
Dadasaheb Phalke Award 2023: ज्येष्ठ अभिनेत्री वहीदा रेहमान यांना दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com