Kangana Ranaut Wedding: परिणीती चोप्रानंतर आता कंगना रनौत अडकणार विवाहबंधनात?, या अभिनेत्याने ट्वीट करत केला दावा

Kangana Ranaut Wedding News: कंगना लवकरच लग्न करणार असल्याचा दावा बॉलिवूडच्या अभिनेत्याने ट्वीट करत केला आहे.
Kangana Ranaut
Kangana RanautSaam TV

Kamal R Khan Tweet On Kangana Ranaut:

बॉलिवूड (Bollywod) अभिनेत्री परिणीती चोप्रा (Parineeti Chopra) नुकताच विवाहबंधनात अडकली. परिणीतीच्या लग्नानंतर आता आणखी एक बॉलिवूड अभिनेत्री लग्न करणार असल्याच्या चर्चा रंगू लागल्या आहेत. ही अभिनेत्री दुसरी तिसरी कुणी नसून बॉलिवूडची 'कॉन्ट्रव्हर्सी क्वीन' म्हणजेच अभिनेत्री कंगना रनौत (Kangana Ranaut) ही आहे. कंगना लवकरच लग्न करणार असल्याचा दावा बॉलिवूडच्या अभिनेत्याने ट्वीट करत केला आहे.

बॉलिवूड अभिनेता आणि फिल्म क्रिटिक कमाल राशिद खानने नुकताच ट्वीट करत कंगनाच्या लग्नाबाबत दावा केला आहे. कमाल आर खान उर्फ ​​केआरके ट्वीटरवर खूप सक्रिय आहे. चित्रपटांच्या समीक्षणासोबतच तो बॉलीवूड स्टार्सबद्दल आपले मत व्यक्त करत असतो. आता कमाल आर खानचे कंगना रनौतच्या लव्हलाईफवर मोठं वक्तव्य केले आहे. त्याने कंगनाच्या लग्नाबाबत केलेले ट्वीट चर्चेत आले आहे.

कमाल आर खानने ट्वीट करत असे लिहिले आहे की, 'ब्रेकिंग न्यू: अभिनेत्री कंगना रनौत डिसेंबर २०२३ मध्ये एका बिझनेसमनसोबत एंगेजमेंट करणार आहे. एप्रिल २०२४ मध्ये ती लग्न करणार आहे. त्यासाठी एडव्हान्समध्ये अभिनंदन.' कमाल आर खानच्या या ट्विटनंतर आता कंगना लग्न करणार असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. लग्नाबाबत कंगना रनौतने अद्याप कोणतीही माहिती दिली नाही. त्यामुळे कमाल आर खानने केलेला दावा कितपत खरा हे सांगणं कठीण आहे.

केआरके अनेकदा बॉलिवूड स्टार किंवा त्याच्या चित्रपटाबद्दल ट्वीट करत असतो. आपल्या ट्विटमुळे तो अनेकदा चर्चेत असतो. त्याचसोबत या ट्विटमुळे तो अडचणीत देखील आला आहे. कंगना रनौत सध्या तिच्या चंद्रमुखी- २ चित्रपटामुळे चर्चेत आहे. २००५ मध्ये प्रदर्शित झालेल्या चंद्रमुखी चित्रपटाचा हा सीक्वल आहे. हा चित्रपट येत्या २८ सप्टेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे.

कंगनाच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचे झाले तर, कंगना रनौत 'तेजस', 'इमर्जन्सी' आणि 'चंद्रमुखी २' या चित्रपटात काम करताना दिसणार आहे. कंगना रनौत शेवटची २०२२ मध्ये रिलीज झालेल्या 'धाकड' या चित्रपटात दिसली होती. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरला. महत्वाचे म्हणजे, नवाजुद्दीन सिद्दीकी आणि अवनीत कौर स्टारर चित्रपटा 'टिकू वेड्स शेरू'ची निर्मिती कंगना रनौतने केली होती. या चित्रपटाच्या माध्यमातून कंगनाने प्रॉडक्शनमध्ये प्रवेश केला आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com