OPPO Reno12 Pro 5G  OPPO
बिझनेस

OPPO Reno12 Pro 5G: सुपर डुपर आहेत OPPOच्या फोनचे फीचर्स; पाहताच क्षणी स्मार्टफोन कराल खरेदी

OPPO Reno12 Pro 5G Phone Feature: ओप्पोने OPPO Reno12 Pro 5G या स्मार्टफोनच्या फीचर्सच्या आणि किंमतीची माहिती दिलीय. हे फीचर्स जाणून घेताच तुम्ही फोन घेण्यासाठी घाई कराल यात शंका नाही. चला तर जाणून घेऊ नव्या फोनचे फीचर्स.

Bharat Jadhav

OPPO ने भारतात एक कमाल आणि आकर्षक स्मार्टफोन लॉन्च केलाय. या फोनचं नाव OPPO Reno12 Pro 5G हवं. OPPOने या फोनमध्ये अनेक असे एआय फीचर्स दिलेत. हे फीचर्स पाहून तुम्ही फोन घेण्याची घाई कराल. या फोनमध्ये एआय एनेबल्ड कॅमेरा देण्यात आलाय, यामुळे वापरकर्त्याला एक उत्कृष्ट फोटोग्राफीचा अनुभव मिळेल. या कॅमेऱ्यात एआय इरेजर २.०, एआय क्लियर फेस, एआय बेस्ट फेस आणि एआय स्टुडिओ सारखे फीचर्स देण्यात आलेत. एआय रायटर, एआय स्पीक, एआय समरी आणि एआय रेकॉर्डिंग समरी यासारखे इतर अनेक AI फीचर्सने हा फोन सुपर डुपर हिट ठरलाय.

OPPO स्मार्टफोनमध्ये ट्रिपल कॅमेरा सेटअप आहे, ज्याचा मुख्य कॅमेरा 50MP Sony LYT-600 सेन्सरसह ऑप्टिकल इमेज स्टॅबिलायझेशन म्हणजेच OIS सपोर्ट आणि f/1.8 लेन्स ऍपर्चरसह येतो. फोनचा दुसरा बॅक कॅमेरा Samsung S5KJN5 च्या 50MP टेलिफोटो लेन्ससह येतो. पोर्ट्रेट फोटोग्राफीसाठी कंपनीने या सेन्सरमध्ये अनेक खास फिचर्स दिले आहेत. तर तिसरा कॅमेरा 8MP Sony IMX355 अल्ट्रा-वाइड अँगल लेन्ससह येतो. या फोनमध्ये 50MP सेल्फी कॅमेरा असेल. हे ज्याच्या मदतीने तुम्ही तुमचे पोट्रेट आणि सेल्फी काही सेकंदात कोणत्याही त्रासाशिवाय घेऊ शकता.

OPPO Reno12 Pro 5G चे डिझाइन

हा फोन OPPO Reno सीरिजमधील आतापर्यंतचा सर्वात मजबूत फोन आहे. या फोनची बॉडी मजबूत करण्यासाठी OPPO ने यात हाय-स्ट्रेंथ अलॉय फ्रेमवर्क वापरलाय. हा फोन कोणत्याही धातूइतका मजबूत आणि टिकाऊ आहे. फोन कॉर्निंग गोरिल्ला ग्लास व्हिक्टस 2 संरक्षणासह येतो. जे फोनला अल्ट्रा-फ्लॅगशिप लेव्हल प्रोटेक्शन देते. समजा फोन खाली पडला किंवा स्क्रॅच पडला तरीही या फोनच्या बॉडीला आणि स्क्रीनला काही होत नाही.

OPPO Reno12 Pro 5G दोन प्रकारांमध्ये उपलब्ध

12GB+256GB मॉडेलसाठी 36,999 रुपये आणि 12GB+512GB मॉडेलसाठी 40,999 रुपये. OPPO Reno12 Pro 5G भारतात 18 जुलैपासून OPPO ई-स्टोअर, फ्लिपकार्ट आणि मेनलाइन रिटेल आउटलेटवर विक्रीसाठी उपलब्ध असेल. OPPO Reno12 सीरिजच्या पहिल्या विक्रीवर ग्राहक खालील ऑफरचा लाभ घेऊ शकतात. -

ग्राहक Flipkart, OPPO ई-स्टोअर आणि SBI, HDFC बँक, ICICI बँक, वन कार्ड, कोटक बँक, बँक ऑफ बडोदा आणि DBS कडील प्रमुख किरकोळ विक्रेत्यांकडून 4,000 रुपयांपर्यंतचा झटपट कॅशबॅक मिळू शकतो. तसेच 9 महिन्यांपर्यंत विनाखर्च EMIचा देखील लाभ मिळेल.

जे ग्राहक 18 जुलैच्या मध्यरात्रीपूर्वी Reno12 Pro 5G आणि 25 जुलैच्या मध्यरात्रीपूर्वी Reno12 5G प्री-बुक करतील त्यांना 6 महिन्यांची विशेष वन-टाइम-स्क्रीन रिप्लेसमेंट (OTSR) सेवा मिळेल. याव्यतिरिक्त ग्राहक बजाज फिनसर्व्ह, टीव्हीएस क्रेडिट, एचडीबी फायनान्शियल सर्व्हिसेस, आयडीएफसी फर्स्ट बँक आणि होम क्रेडिट सारख्या आघाडीच्या फायनान्सरकडून शून्य डाउन पेमेंट आणि लो-डाउन पेमेंट योजनांचा लाभ घेऊ शकतात.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Exit Poll: नागपूर दक्षिणमध्ये देवेंद्र फडणवीस होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Polls : कल्याण ग्रामीणमध्ये मनसेचं इंजिन धावणार का? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Poll: तुमसरमध्ये राजू कारेमोरे होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

महाराष्ट्राचा महानिकाल, निवडणूक निकालाचं हेडक्वार्टर SAAM TV

Maharashtra Election Result : महाराष्ट्र कुणाचा? मतमोजणी कधीपासून आणि कुठे पाहाल?

SCROLL FOR NEXT