OnePlus Ace 3 Saam Tv
बिझनेस

OnePlus Ace 3 झटपट होतो चार्ज; जाणून घ्या भारतात कधी होणार लॉन्च, काय असेल किमत

oneplus ace 3 : जर तुम्हाला फोटोग्राफीची आवड असेल तर हा मोबाईल उत्कृष्ट आहे. फोनमध्ये स्टीरिओ स्पीकर ते ट्रिपल कॅमेरा सेटअपसारखे फीचर्स देखील देण्यात आले आहेत. अशा विविध फीचर्स असलेला हा मोबाईल फोन भारतात कधी लॉन्च होणार याची वाट मोबाईलप्रेमी पाहत आहेत.

Bharat Jadhav

Smartphone OnePlus Ace 3 :

चीनमध्ये नुकत्याच झालेल्या एका कार्यक्रमात OnePlus Ace 3 मोबाईल फोन लॉन्च करण्यात आला. हा मोबाईल फोन फ्लॅगशिप स्मार्टफोन आहे. कंपनीने या मोबाईलमध्ये Qualcomm Snapdragon 8 Gen 2 प्रोसेसर दिलंय. यासह १०० wSuperVOOC जे सूपर फास्ट चार्ज करण्यास मदत करतं. याशिवाय फोनमध्ये स्टीरिओ स्पीकर ते ट्रिपल कॅमेरा सेटअप सारखे फीचर्स देखील देण्यात आले आहेत. अशा खास फीचर्स असलेला मोबाईल भारतात याच महिन्यात लॉन्च केला जाण्याची शक्यता आहे. (Latest News)

OnePlus Ace 3 की किमत 12GB + 256GB च्या व्हेरिएंटसाठी CNY २,५९९ (साधारण ३०,००० रुपये) , 16GB + 512GB व्हेरिएंटसाठी CNY २,९९९( भारतीय रुपयात म्हटलं तर ४०,०००) राहील. 16GB + 1TB च्या व्हेरियंटच्या मोबाईलसाठी CNY ३,४९९ ( ४०,००० रुपये असेल.) हा मोबाईल फोन निळ्या आणि काळ्या रंगात उपलब्ध असेल.

OnePlus Ace 3 च्या इतर बाबी जाणून घ्या

ड्युअल-सिम (नॅनो) सपोर्ट असलेला हा स्मार्टफोन Android 14 वर आधारित आहे. ColorOS 14.0वर हा फोन चालतो. यात ४,५०० नीट्स पीक ब्राइटनेस आणि ३६० Hz सॅपलिंग रेटसह ६.७८ इंच (१,२६४ ×२,७८० पिक्सेल) Oriental AMOLED LTPO डिस्प्ले देण्यात आलाय. यात १२० Hzचं रिफ्रेश रेटपण दिलं जातं. वनप्लसच्या या लेटेस्ट स्मार्टफोनमध्ये १६ GB पर्यंत LPDDR5X रॅम आणि Adreno 740 GPU सह ऑक्ट-कोर ४ NM Snapdragon 8 Gen 2 प्रोसेसर देण्यात आलं आहे.

जर तुम्हाला फोटोग्राफीची आवड असेल तर हा मोबाईल उत्कृष्ट आहे. या मोबाईलच्या मागील बाजूला २ मेगापिक्सेल आणि ५० MP कॅमेरा देण्यात आलाय. समोरील बाजूल ८ मेगापिक्सेल अल्ट्रा-वाइड अँगलचा कॅमेरा देण्यात आलाय. यासह सेल्फी आणि व्हिडिओ चॅटिगसाठी यात १६ मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा देखील देण्यात आलाय.

कनेक्टिव्हिटीच्या बाबतीत हा फोन 5G, 4G LTE, Wi-Fi 7, Bluetooth 5.3, Beidou, GLONASS, Galileo, GPS आणि NFC च्या नेटवर्कला सपोर्ट करतं. या मोबाईलमध्ये Dolby Atmosच्या सपोर्टसह स्टीरिओ स्पीकर्स देण्यात आली आहेत. OnePlus Ace 3 ची बॅटरी ५,५०० mAh आहे तर मोबाईलला 100W SuperVOOC फास्ट चार्जिंग सपोर्ट देण्यात आलाय. हा फोन अवघ्या २७ मिनिटात ० ते १०० टक्के चार्ज होत असतो.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Viral Video: मराठी बोलल्यानं तिकीट नाकारलं! नाहूरमध्ये नेमकं काय घडलं? - VIDEO

Ramdas Athawale : एकनाथ शिंदेंची केंद्रात रवानगी होणार? रामदास आठवलेंच्या दाव्यामुळे राज्यात खळबळ,VIDEO

Shocking News: पालकांनो, मुलांना पुऱ्या देताय सावधान! पुरीनं घेतला मुलाचा जीव- VIDEO

Maharashtra Politics : एकनाथ शिंदेंचा देवेंद्र फडणवीसांशी अबोला आणि दुरावा? पडद्यामागे काय सुरु? VIDEO

Kalyan Fire News: कल्याणमध्ये इमारतीच्या १३ व्या मजल्यावर भीषण आग, रहिवाशांमध्ये घबराट,VIDEO

SCROLL FOR NEXT