Redmi Note 13 Pro Plus: २०० मेगापिक्सेलच्या कॅमेऱ्यासह आहेत अनोखे फिचर्स; जाणून घ्या किंमत आणि इतर खास गोष्टी

New Mobile : Redmiआपल्या ग्राहकांसाठी आपला नवा फोन लॉन्च करणार आहे. चीनमध्ये आधीच या फोनची सीरिज लॉन्च करण्यात आलीय. कंपनी लवकरच हा फोन भारतात आणि जागतिक बाजारात लॉन्च करण्याच्या तयारीत आहे. परंतु लॉन्चपूर्वी या मोबाईलचे फिचर्स उघड झाली आहेत.
Redmi Note 13 Pro Plus
Redmi Note 13 Pro PlusHT Tech
Published On

Redmi Note 13 Pro Plus :

रेडमी मोबाईल कंपनी आपल्या ग्राहकांसाठी Redmi 13 ची सीरिज लॉन्च करणार आहे. दरम्यान चीनमध्ये या फोनची सीरिज आधीच लॉन्च करण्यात आलीय. आता कंपनी भारतातील बाजारपेठ आणि जागतिक बाजारात हा फोन उतरवणार आहे. बाजारात येणारा नवा रेडमी नोट १३ सिरीज उद्या लॉन्च केला जाणार आहे. हा मोबाईल फोन कसा असेल त्याचे फिचर्स काय किमत काय असेल याची माहिती समोर आलीय. ही माहिती आज आपण जाणून घेऊ.(Latest News)

Redmi Note 13 सिरीज

  • या सिरीजमध्ये तीन फोन प्रकारचे फोन उपलब्ध आहेत. Redmi Note 13, Redmi Note 13 Pro आणि Redmi Note 13 Pro+ अशी मोबाईची मॉडेल आहेत.

  • 12GB रॅम आणि 512GB स्टोरेज मॉडेलची किरकोळ किंमत 37,999 रुपये असू शकते.

  • लॉन्चच्या अगोदर, Redmi Note 13 मॉडेल TDRA, NBTC आणि इतर अनेक वेबसाइटवर दिसले आहे.

Redmi Note 13 Pro आणि Note 13 Pro+ किमतींची माहिती काही किरकोळ विक्रेत्या वेबसाइटवर देखील पाहिल्या गेल्या आहेत. 12GB RAM व्हेरियंटची किंमत अनुक्रमे EUR 450 आणि EUR 500 आहे.

Redmi Note 13 इतर माहिती

  • यात 6.67-इंचाचा वक्र OLED डिस्प्ले आहे. ज्यामध्ये 120Hz रिफ्रेश रेट आणि कॉर्निंग गोरिल्ला ग्लास विक्टस संरक्षण मिळतं.

  • या मोबाईलमध्ये MediaTek 7200 प्रोसेसर आहे, जे 12GB रॅम आणि 512GB स्टोरेजसह देण्यात आले आहे.

  • या मोबाईलमध्ये जबरदस्त कॅमेरा फिचर देण्यात आले आहे. यात OIS सह 200 MP अल्ट्रा-हाय-रिझोल्यूशन कॅमेरा देण्यात आला आहे.

  • याशिवाय, या फोनमध्ये 120W हायपरचार्जसह 5000mAh बॅटरी आहे.

Redmi Note 13 Pro Plus
Recharge: नवीन वर्षाचं गिफ्ट; दमदार सूटसह रिचार्जवर मिळेल मोफत OTT चा आनंद

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com