Recharge: नवीन वर्षाचं गिफ्ट; दमदार सूटसह रिचार्जवर मिळेल मोफत OTT चा आनंद

Jio - Recharge: जिओ रिलायन्स किंवा वोडाफोन-आयडिया या टेलिकॉम कंपन्या आपल्या ग्राहकांना नवीन वर्षासाठी नव्या ऑफर्स देत आहेत. एका वर्षाच्या रिचार्जवर ग्राहकांना विविध सेवा मिळत आहेत.
Recharge: नवीन वर्षाचं गिफ्ट; दमदार सूटसह रिचार्जवर मिळेल मोफत OTT चा आनंद

Jio - VI Recharge :

जर तुम्ही जिओ रिलायन्स किंवा वोडाफोन-आयडियाचे ग्राहक असाल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. दोन्ही टेलिकॉम कंपन्या आपल्या यूझर्सला दमदार रिचार्ज ऑफर देत आहेत. जर तुम्ही थेट एक वर्षाचा रिचार्ज प्लान घेत असाल तर तुम्हाला अनेक सेवांचा लाभ मिळेल. (Latest News)

जिओचा नवीन वर्ष धमाका ऑफर

Jio ने नवीन वर्षासाठी सर्वोत्तम प्लॅन आणलाय. एका वर्षाच्या रिचार्जसाठी २९९९ रुपये भरावे लागतील. या रिचार्जची वैधता ३६५ दिवसापर्यंत असेल. अतिरिक्त २४ दिवस देखील हा रिचार्ज वापरता येईल, म्हणजे हा रिचार्ज ३८९ दिवसांपर्यंत वैध राहील. तुम्हाला प्रत्येक दिवशी २.५ जीबी डेटा मिळेल. या रिचार्जसोबत युझर्सला अनलिमिटेड ५ जी डेटाचा लाभ मिळेल. म्हणजेच तुमचा इंटरनेटचा डेटा कधीच संपणार नाही. या प्लानमध्ये युझर्सला अनलिमिटेड कॉल्स (unlimited calls) आणि प्रतिदिवस १०० शंभर फ्री एसएमएस (SMS) करता येतील. तसेच जिओ टीव्ही (Jio TV)आणि जिओ सिनेमाचा फ्री एक्सेस मिळेल.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

वोडाफोन- आयडियाचा प्लान

वोडाफोन-आयडिया कंपनी आपल्या ग्राहकांना वर्षभर चालणाऱ्या रिचार्जची ऑफर देत आहे. या रिचार्जसाठी ३०९९ रुपये मोजावे लागतील. व्हीआयच्या अॅपवरून रिचार्ज केला तर युझर्सला ७५ रुपयांची सूट देखील मिळेल आणि ५० जीबीचा अतिरिक्त डेटादेखील मिळेल. व्हीआय युझर्सला या रिचार्जवर २ जीबी डेटा मिळेल जो ३६५ दिवसांपर्यंत वैध राहील.

तर दररोज १०० मोफत एसमएस करण्यास मिळतील. या प्लानमध्ये युझर्स लोकांना अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा मिळेल. युझर्सने वर्षभरासाठी हा रिचार्ज केला तर बिंज ऑल नाइट, वीकेंड डेटा, रोलओव्हर, डेटा डिलाइट्स, व्हीआय मुव्हीज अ‍ॅण्ड टीव्ही अ‍ॅपच्या सुविधा मिळतील. तसेच डिज्नी प्लस हॉटस्टार मोबाईलची सदस्यता देखील मिळेल.

Recharge: नवीन वर्षाचं गिफ्ट; दमदार सूटसह रिचार्जवर मिळेल मोफत OTT चा आनंद
Government Rule For Social Media: फेसबूक आणि इंस्टाग्रामबाबत सरकारचा महत्वाचा निर्णय; बदल करा अन्यथा अकाउंट डिलीट होईल

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com