Nothing Phone 2a Special Edition
Nothing Phone 2a Special Edition Google
बिझनेस

50MP कॅमेरा अन् 12GB रॅमसह Nothing Phone 2a Special Edition लाँच; जाणून घ्या किंमत

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

प्रसिद्ध स्मार्टफोन उत्पादक कंपनी Nothing ही देशातील अनेक कंपन्याशी स्पर्धा करत आहे. Nothing कंपनी हाय क्वालिटी आणि उत्तम फीचर्स असलेले स्मार्टफोन लाँच करत असते. कंपनीने नुकताच Nothing Phone 2a चा नवीन व्हेरियंट लाँच केला आहे. या नवीन फोनचे नाव Nothing Phone 2a Special Edition असे आहे. यामध्ये तुम्हाला रेड, यलो, ब्लू, व्हाईट आणि ग्रे असे कलर ऑप्शन मिळतील.

कंपनीने या डिव्हाइसला ट्रान्सफरन्ट ठेवले आहे. कंपनीच्या या स्मार्टफोनचे काही मर्यादित डिव्हाइस लाँच केले आहे. हा स्मार्टफोन तुम्ही कंपनीच्या अधिकृत वेबसाइटवरुन खरेदी करु शकता.

किंमत

Nothing Phone 2a Special Edition स्मार्टफोनमध्ये 12GB RAM+ 256GB स्टोरेज उपलब्ध आहे. या स्मार्टफोनची किंमत २७,९९९ रुपये आहे. या हँडसेट ५ जूनपासून फ्लिपकार्टवर उपलब्ध होणार आहे.

Nothing Phone 2a Special Edition स्मार्टफोन ड्युअल सिमला सपोर्ट करतो. यात तुम्हाला 6.7 इंचाचा AMOLED डिस्प्ले मिळतो. हा 120 Hz रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो. स्क्रिन प्रोटेक्शनसाठी हँडसेटला गोरिल्ला ग्लास 5 लावण्यात आले आहे. हा स्मार्टफोन Android 14 वर आधारित असून Nothing OS 2.5 वर काम करतो.

स्मार्टफोनमध्ये MediaTek Dimensity 7200 Pro प्रोसेसर देण्यात आला आहे. त्याचसोबत 50MP+50 MP ड्युअल कॅमेरा सेटअप दिला आहे. तर 32 MP सेल्फी कॅमेरा दिला आहे. हा स्मार्टफोन 45W वायर्ड चार्जिंगसोबत येतो.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bajaj CNG Bike: जगातील पहिली CNG बाईक Freedom आज होणार लॉन्च, जबरदास्त फीचर्ससह किती आहे किंमत?

Solapur Breaking : शेतकऱ्यावर कोसळलं आभाळ, महावितरणच्या विद्युत तारेने केला घात; ओढ्यात विजेचा धक्का लागून 24 म्हशींचा मृत्यू

Aadhaar Card: आता आधार कार्ड बनवायला लागू शकतात 6 महिने, UIDAIने केले 3 मोठे बदल

Shukra Rashi Parivartan : ४ दिवसांत ३ राशींचे नशीब उजळणार; यशाचा मार्ग गवसणार, वाचा

Pune Tourist Places: पुण्यात पर्यटनस्थळी प्रतिबंधात्मक आदेश लागू! कुठल्या ठिकाणी जमावबंदी आणि काय आहेत नियम? जाणून घ्या

SCROLL FOR NEXT