UIDAI Aadhaar App Saam Tv
बिझनेस

UIDAI: आता काही सेकंदात करा आधार कार्ड डाउनलोड अन् अपडेट; नवीन Aadhaar App लाँच; फीचर्स वाचा

New UIDAI Aadhaar App Launched: यूआयडीएआयने नवीन आधार अॅप लाँच केले आहे. या अॅपद्वारे तुम्ही आधार कार्डची सर्व कामे ऑनलाइन पद्धतीने करु शकतात.

Siddhi Hande

UIDAI ने केलं नवीन आधार अॅप लाँच

आधार कार्डची माहिती अपडेट करणे झाले सोपे

नवीन आधार अॅपचे फीचर्स

आधार कार्ड हे खूप महत्त्वाचे कागदपत्र आहे. आधार कार्डमुळे सर्व कामे सोपी होतात. सर्व सरकारी कामांसाठी आधार कार्ड लागतात. दरम्यान, आता सरकारने युनिक आयडेंटिफिकेशन ऑथोरिटी ऑफ इंडिया (UIDAI) ने एक नवीन आधार अॅप लाँच केले आहे. यामुळे तुमची आधारशी संबंधित सर्व कामे सोपी होणार आहे.

नवीन आधार अॅप हे जुन्या एम-आधार अॅपपेक्षा वेगळे आहे. या अॅपमध्ये जवळपास १४० कोटी आधार कार्डधारकांना डेटा आहे. त्यांची डिजिटल ओळख अधिक सोपी आणि सुरक्षित करण्याच्या उद्देशाने हे नवीन अॅप लाँच केले आहे. यामध्ये तुम्ही तुमच्या स्मार्टफोनवर डिजिटल पद्धतीने आधार कार्ड संग्रहित करण्याची सुविधा देतात.

नवीन आधार अॅप हे तुम्ही गुगल प्ले स्टोअर किंवा अॅप प्ले स्टोअरमधून डाउनलोड करु शकतात.जुन्या आधार अॅपमुळे कुटुंबातील सदस्यांचेही आधार कार्ड मॅनेज करणे शक्य नव्हते. मात्र, आता या नवीन अॅपमध्ये तुम्ही तुमच्यासोबत कुटुंबाच्या सदस्यांचेही आधार कार्ड मॅनेज करु शकतात.

जुन्या अॅपमध्ये युजर्संना नाव, पत्ता, मोबाईल नंबर ही माहिती अपडेट करण्याची परवानगी होती. मात्र, तरीही आधार सेवा केंद्राला भेट देणे आवश्यक होते. मात्र, आता या नवीन अॅपमुळे या अडचणी कमी होणार आहे. तुम्ही ऑनलाइन पद्धतीने सर्व कामे करु शकतात.आधार कार्डवरील माहिती अपडेट करु शकतात.

नवीन आधार अॅपचे फीचर्स (New Aadhaar App Features)

अनेक आधार कार्ड मॅनेज करता येणार

युजर्स कुटुंबातील पाच सदस्यांचे आधार कार्ड जोडू आणि व्यवस्थापित करु शकतात. दरम्यान, यासाठी एक सामान्य नोंदणीकृत मोबाईल नंबर शेअर करावा लागेल.

बायोमेट्रिक लॉक

तुमचे बायोमेट्रिक लॉक आधार डेटा लॉक करण्याची परवानगी देते. तुम्ही स्वतः अनलॉक केल्याशिवाय इतरांना याबाबत माहिती मिळणार नाही. यासाठी तुम्ही फेस किंवा फिंगरप्रिंट वापरु शकतात.

कोणती माहिती शेअर करायची यावर तुमचे नियंत्रण

आता युजर्स इतरांना माहिती शेअर करताना कोणती माहिती शेअर करायची हे ठरवू शकतात. यामध्ये जर तुम्हाला तुमचा पत्ता सांगायचा नसेल तर तेवढी माहिती लपवू शकतात.

क्यूआर कोड

आधार क्यूआर कोड अॅपद्वारे तयार आणि स्कॅन केले जाऊ शकतात. यामुळे तुमच्या कागदपत्रांची पडताळणी लवकर होते.

इंटरनेटशिवाय वापरता येणार

एकदा तुम्ही पहिल्यांना लॉग इन केले की त्यानंतर इंटरनेटशिवायदेखील आधारची माहिती पाहू शकतात.

अॅक्टिव्हिटी ट्रॅकिंग

अॅपमध्ये वापर लॉग आहे. यामध्ये तुमचे आधार कार्ड कुठे, केव्हा आणि कसे वापरले जाते याची नोंद केली जाते. यामुळे अधिक पारदर्शकता आणि सुरक्षितता येते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

EVM: उंदराने भेदला स्ट्राँगरुमचा पहारा, स्ट्राँगरुमचा दरवाजा उघडला, राज्यात खळबळ

Prithviraj Chavan: 19 डिसेंबरला होणार मराठी पंतप्रधान'; पृथ्वीराज चव्हाणाचं वक्तव्य, राज्यात खळबळ

Mumbai Crime : खळबळजनक! मुंबईतील स्थानिक गुंडांकडून भररस्त्यात पोलिसांवर हल्ला

IND vs SA 3rd T20I: भारतीय 'धुरंधरां'चा करिष्मा; ७ विकेट राखत टीम इंडियाचा शानदार विजय, मालिकेत २-१नं आघाडी

ऐन पालिका निवडणुकीच्या तोंडावर ठाकरेंना बसणार मोठा धक्का; बड्या महिला नेत्या भाजपमध्ये प्रवेश करणार?

SCROLL FOR NEXT