Aadhaar App: आता QR कोडद्वारे शेअर करता येणार आधार कार्ड; नवीन आधार अ‍ॅप कसं वापरायचं? वाचा सविस्तर

Aadhaar App: यूआयडीएआयने नवीन आधार अॅप लाँच केले आहे. आधार अॅपमुळे आता तुम्हाला कोणालाही डिजिटल पद्धतीने आधार कार्ड शेअर करता येणार आहे.
Aadhaar App
Aadhaar AppSaam Tv
Published On
Summary

UIDAI ने केलं आधार अॅप लाँच

डिजिटल आधार शेअर करता येणार

ऑफलाइन पद्धतीने हार्ड कॉपीची गरज नाही

आधार कार्ड हे प्रत्येकासाठी महत्त्वाचे कागदपत्र आहे. आता आधार कार्डसाठी UIDAI ने एक अॅप लाँच केले आहे. या नवीन अॅपमुळे आधारसंबंधित सर्व कामे एकाच ठिकाणी करता येणार आहे. तुम्हाला डिजिटल आधार कार्ड तुमच्या फोनमध्ये ठेवू शकतात. यामुळे तुम्हाला प्रत्येक ठिकाणी आधार कार्डची हार्डकॉपी घेऊन जाण्याची गरज नाही.

या नवीन आधार अॅपमुळे आधार कार्ड शेअरदेखील करता येणार आहे. याचसोबत तुम्ही अॅपमधून फेस स्कॅन करुन व्हेरिफिकेशन करु शकतात. यूआयडीएआयने दिलेल्या माहितीनुसार, तुम्ही अँड्रॉइड आणि आयफोन दोन्हीवर हे अॅप इन्स्टॉल करु शकतात.

Aadhaar App
E-Aadhaar App: ई-आधारवर सगळी कामे झटक्यात होणार, अ‍ॅप नेमकं आहे तरी काय? या दिवशी होणार लाँच

या नवीन आधार अॅपमुळे तुम्हाला कुठेही ऑफलाइन पद्धतीने घेऊन जाण्याची गरज नाही. तुम्ही डिजिटल पद्धतीने हे आधार कार्ड शेअर करु शकतात. याचसोबत यामध्ये क्यूआर कोड पडताळणी, फेस आयडी आणि फेस रिकग्निशन असे अनेक फीचर्सदेखील आहेत.

आधार अॅप कसं वापरायचं? (Aadhaar App Download Process)

सर्वात आधी तुम्हाला आधार अॅप गुगल प्ले स्टोअरवरुन डाउनलोड करायचे आहे.

यानंतर तुम्हाला आधार नंबर टाकायचा आहे.

यानंतर तुम्हाला सर्व अटी आणि शर्ती स्वीकाराव्या लागतील. यानंतर आधारशी लिंक असलेल्या फोन नंबरची पडताळणी का.

यानंतर व्हेरिफिकेशन पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला आधार अॅप सेटअप करता येणार आहे.

यानंतर तुम्हाला फेस ऑथेंटिकेशन करावे लागणार आहे.

आधार अॅपसाठी तुम्हाला पिन सेट करावा लागेल.यानंतर तुम्ही हे अॅप वापरु शकतात.

Aadhaar App
Aadhaar App: आधारचे नवे अ‍ॅप लॉंच, मोबाईलमध्येच वापरता येणार खास फिचर्स, घरबसल्या होतील सगळी कामे

या नवीन अॅपमध्ये तुम्हाला क्यूआर कोडद्वारे डिजिटल आधार कार्ड शेअर करता येणार आहे. याचसोबत आयडी शेअर करताना कोणती माहिती समोरच्यासोबत शेअर करायची हे तुम्ही निवडू शकतात. आधार कार्डमधील सर्व डेटा शेअर करु शकतात. या अॅमध्ये बायोमॅट्रिक माहिती लॉक आणि अनलॉक करण्याचेही फीचर आहे.

Aadhaar App
PAN-Aadhaar Linking: ...तर तुमचं पॅन कार्ड कायमचं होईल बंद, कधीपर्यंत दिली मुदत?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com