

UIDAI ने नवे Aadhaar App लाँच केले आहे.
अॅपमध्ये फेस लॉक आणि बायोमेट्रिक सिक्युरिटीसह प्रायव्हसीला प्राधान्य दिले आहे.
नागरिकांना आता घरबसल्या आधार डाउनलोड, अपडेट आणि पडताळणी करता येणार आहे.
आधार कार्ड हा भारतीय नागरिक पुरावा आहे. त्यामुळे हा पुरावा अचूक असणे महत्वाचे असते. बऱ्याचदा यामध्ये नावात किंवा पत्त्यामध्ये चूका आढळतात. त्यामुळे सतत पोस्टात जाऊन लांबच्या लांब रांगा लावून त्यात बदल करून घ्यावे लागतात. त्यामध्ये १५ दिवसांचा कालावधी जातो. मात्र आता याची गरज नाही. कारण यूनीक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडिया (UIDAI) ने नवीन आधार अॅप लाँच केले आहे. या अॅपच्या माध्यमातून देशातील १४० कोटी नागरिकांना त्यांचे डिजिटल आधार कार्ड स्मार्टफोनमध्ये सेव्ह करून सुरक्षितपणे ठेवू शकणार आहेत.
आता आधारचे हे नवे अॅप Google Play Store आणि Apple App Store वर मोफत डाउनलोडसाठी उपलब्ध आहे. त्यातून तुम्ही तुमचे आधार कार्ड सहज डाऊनलोड करू शकता. या अॅपमध्ये तुम्हाला फेस लॉक, बायोमेट्रिक लॉक, तसेच QR कोडवर आधारित शेअरिंग सिस्टम देण्यात आली आहे. त्यामुळे अॅप यूजर्सचा डेटा आणि प्रायव्हसी जास्त सुरक्षित राहणार आहे.
आधारच्या या अॅपची खासियत म्हणजे यामध्ये तुम्ही एकाच डिव्हाइसमध्ये पाच सदस्यांचे आधार प्रोफाइल्स जोडू शकता. यासाठी त्यांचा लिंक केलेला फोन नंबर एकसारखा असला पाहिजे.
आधारच्या अॅपमधील महत्त्वाच्या फीचर्समध्ये मल्टी-प्रोफाइल मॅनेजमेंट, बायोमेट्रिक सिक्युरिटी लॉक, सिलेक्टिव्ह डेटा शेअरिंग, QR कोड पडताळणी, ऑफलाइन अॅक्सेस, आणि यूसेज हिस्ट्री मॉनिटरिंग यांचा समावेश असणार आहे. म्हणजेच युजर्सना आपली माहिती कोण, केव्हा आणि कुठे वापरली गेली हेही पाहता येणार आहे.
नवीन आधार अॅप सेटअप करणे अगदी सोपे आहे. सर्वप्रथम Google Play Store किंवा Apple App Store वर जाऊन अधिकृत Aadhaar अॅप डाउनलोड करा. त्यानंतर अॅप उघडून १२ अंकी आधार क्रमांक टाका, OTP येईल त्याने व्हेरिफिकेशन करा आणि फेस स्कॅन ऑथेंटिकेशन पूर्ण करा. शेवटी सहा अंकी सिक्युरिटी PIN सेट करून तुमचं प्रोफाइल सुरक्षित ठेवा.
UIDAI ने कोणते नवीन अॅप लाँच केले आहे?
UIDAI ने नवीन 'Aadhaar App' लाँच केले आहे ज्याद्वारे नागरिकांना आधार कार्ड मोबाईलमध्ये डाउनलोड करता येईल.
या अॅपमध्ये कोणकोणते महत्त्वाचे फीचर्स आहेत?
फेस लॉक, बायोमेट्रिक सिक्युरिटी, मल्टी प्रोफाइल मॅनेजमेंट, QR कोड शेअरिंग आणि ऑफलाइन अॅक्सेस ही या अॅपची मुख्य वैशिष्ट्ये आहेत.
हे अॅप कसे डाउनलोड करायचे?
हे अॅप Google Play Store आणि Apple App Store वर मोफत उपलब्ध आहे. “Aadhaar App” शोधून डाउनलोड करा.
अॅपमध्ये किती प्रोफाइल्स जोडता येतील?
एका डिव्हाईसमध्ये जास्तीत जास्त ५ सदस्यांचे आधार प्रोफाइल्स जोडता येतात.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.