Sakshi Sunil Jadhav
आचार्य चाणक्य हे इतिहासातील अत्यंत प्रख्यात आणि विद्वान तत्त्वज्ञ मानले जातात. त्यांच्या चाणक्य नीतीमध्ये जीवनातील प्रत्येक क्षेत्रासाठी मार्गदर्शन मिळते.
चाणक्य हे धन, संबंध, नीती, की आत्मसंयम या विषयांवर सतत नवीन गोष्टी सांगत असतात. चला जाणून घेऊया चाणक्यांच्या काही अमूल्य शिकवणी, ज्या आजही तितक्याच उपयोगी आहेत.
चाणक्य सांगतात की, जीवनात जर कधी प्रसंग आला तर संपूर्ण धनसंपत्तीचा त्याग करून पत्नीची सुरक्षा करावी. कारण पत्नी ही जीवनात खरी साथ देणारी असते.
चाणक्यांच्या मते, स्वत:च्या रक्षणासाठी धन आणि पत्नी दोघांचाही त्याग करणे योग्य आहे. स्वत:चे कल्याण हे सर्वश्रेष्ठ मानले जाते.
चाणक्य म्हणतात ज्या ठिकाणी एकही धनवान, विद्वान किंवा सज्जन व्यक्ती राहत नाही, त्या ठिकाणी कधीही राहू नये.
चाणक्य सांगतात की, जर सोने घाणीत पडले असेल तरी ते स्वच्छ करून स्वीकारावं. म्हणजेच चांगली गोष्ट कुठूनही मिळाली तरी ती स्वीकारावी.
ज्ञान हे सर्वश्रेष्ठ असते. ते कोणाकडून मिळते हे पाहू नये. योग्य ज्ञान जिथून मिळेल ते घेतलेच पाहिजे.
चाणक्य म्हणतात की, ज्याच्याकडे आज्ञाधारक पुत्र आणि साथ देणारी पत्नी असते त्याच्यासाठी ही पृथ्वीच स्वर्गासारखी असते.
चाणक्य सांगतात की, जो मित्र समोर गोड बोलतो पण पाठीमागे टीका करतो, अशा व्यक्तीपासून दूर राहा.
चाणक्य सांगतात की, भविष्यकाळातील संकटांना तोंड देण्यासाठी पैसा साठवणे आवश्यक आहे. हेच जीवनातील स्थैर्याचे मूळ आहे.