

आधार -पॅन कार्ड लिंकबाबत महत्त्वाची बातमी
या तारखेपर्यंत करता येणार आधार पॅन लिंक
नवीन वर्षात बंद होईल पॅन कार्ड
आधार कार्ड हे प्रत्येक भारतीय नागरिकासाठी महत्त्वाचे कागदपत्र आहे. आधार आणि पॅन कार्ड ही दोन्ही कागदपत्रे सरकारी कामांसाठी महत्त्वाची असतात. दरम्यान, आता आधार आणि पॅन कार्ड लिंक असणे अनिवार्य आहे. जर तुम्ही आधार पॅन लिंक नाही केले तर तुमचे पॅन कार्ड बंद होईल. त्यामुळे लवकरात लवकर आधार आणि पॅन कार्ड लिंक करा.
आयकर विभागाने याबाबत माहिती दिली आहे. आधार आणि पॅन कार्ड लिंक करण्याची शेवटची तारीख ३१ डिसेंबर २०२५ आहे. जर तुम्ही मुदतीपूर्वी हे काम केले नाही तर तुमचे पॅन कार्ड निष्क्रिय केले जाईल.यामुळे तुम्ही टॅक्स रिटर्न भरु शकणार नाही. त्यामुळे लवकरात लवकर हे काम केले.
पॅन कार्ड हे कागदपत्र बँक अकाउंट उघडताना, गुंतवणूक करताना, प्रॉपर्टी खरेदी करताना गरजेचे आहे. जर हे पॅन कार्ड बंद झाले तर तुम्हाला अनेक अडचणी येऊ शकतात. त्यामुळे लवकरात लवकर हे काम पूर्ण करुन घ्यावेत.
आधार-पॅन लिंक करण्याची प्रोसेस (Aadhaar Pan Card Linking Process)
सर्वात आधी तुम्हाला https://www.incometax.gov.in या वेबसाइटवर जायचे आहे.
यानंतर होमपेजवर लिंक आधारवर क्लिक करा.
यानंतर तुमचा पॅन नंबर आणि आधार नंबर टाका.
यानंतर तुम्हाला निर्देशानुसार १००० रुपयांचे पेमेंट करायचे आहे.
यानंतर फॉर्म सबमिट केल्यावर रिक्वेस्ट प्रोसेस होईल.
लिंक स्टेट्स कसा चेक करायचा?
सर्वात आधी तुम्हाला Link Aadhaar Status वर क्लिक करायचे आहे.
यानंतर पॅन आणि आधार नंबर टाका.
यानंतर तुमचे आधार आणि पॅन लिंक आहे की नाही याचा स्टेट्स दिसेल.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.