Aadhaar Card Rules Change: आधार कार्डबाबत मोठी अपडेट; कार्ड बनवण्यापासून ते अपडेटपर्यंतच्या नियमांमध्ये अनेक बदल

Aadhaar Card New Rules 2025: आधार कार्डबाबत एक मोठी अपडेट समोर आलीय. पुढील महिन्यापासून म्हणजेच १ नोव्हेंबरपासून आधारकार्डच्या नियमांमध्ये बदल करण्यात आलेत. भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाने अनेक नियमात बदल केली आहेत.
Aadhaar Card New Rules 2025
UIDAI brings new Aadhaar facilities from November 1 — updates now possible from home.Saam Tv
Published On
Summary
  • UIDAIकडून आधार कार्ड नियमांमध्ये मोठा बदल करण्यात आलाय.

  • घरबसल्या नाव, पत्ता आणि मोबाईल अपडेट करता येणार आहे.

  • सेवा अधिक सुरक्षित आणि पारदर्शक करण्यावर भर दिला जात आहे.

आधार कार्डधारकांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. पुढील महिन्यापासून म्हणजेच १ नोव्हेंबरपासून आधार कार्डच्या नियमात बदल करण्यात आली आहेत. UIDAIकडून देण्यात येणाऱ्या नवीन सुविधेनुसार, नागरिक आता घरी बसून नाव,पत्ता, बर्थडे आणि मोबाईल नंबरसारखी कामे करत येतील.

आतापर्यंत कार्डधारकांना विविध दुकानांमध्ये या कामासाठी पैसे द्यावे लागत होते. आता कार्डधारकांना कोणत्याही अपडेटसाठी आधार नोंदणी केंद्रांना भेट देण्याची आवश्यकता नसेल. नवीन नियम बदलाचा उद्देश हा सेवा सरळ, सोपी आणि जास्त सुरक्षित बनवणे आहे.

Aadhaar Card New Rules 2025
Gold Rate: चांदीनंतर आता सोन्याच्या दरात मोठी घसरण; एक लाखावर येणार सोनं? काय आहे कारण जाणून घ्या

ओळखपत्रसाठी लागलीत हे कागदपत्रे

UIDAIच्या नवीन पद्धतीनुसार कार्ड होल्डर्सला काही अपडेट करायचे असेल तर त्यांना काही कागदपत्रे द्यावे लागतील. यात पॅन कार्ड, पासपोर्ट, वाहन चालक परवाना, रेशन कार्ड आणि जन्म प्रमाणपत्र सारखे अधिकृत सरकारी कागदपत्रे लागतील.

इंटरलिंक व्हेरिफकेशन सिस्टिममध्येही तुमचा डेटा अपडेट होईल तसेच तो सुरक्षित राहील. यासह अनरोलमेंट केंद्रात आकारल्या जाणाऱ्या शुल्कातही बदल करण्यात आलाय. कार्ड धारक आपल्या सुविधेनुसार आधारवर ऑनलाइन आणि ऑफलाइन पर्यायचा निवड करू शकतात.

Aadhaar Card New Rules 2025
Aadhaar Card Update : आधार कार्ड अपडेट करायचं? घरबसल्या नाव, पत्ता अन् फोटो बदला, वाचा संपूर्ण प्रोसेस

आधार पॅनकार्डशी लिंक करणं अनिवार्य

दरम्यान सरकारने ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत आधार कार्ड पॅन कार्डशी लिंक करणं अनिवार्य केलंय. जर कोणी लिंक केलं नाही तर १ जानेवारी २०२६ पासून पॅन कार्ड हे अवैध होऊन जाईल. तसेच नवीन पॅन कार्डसाठी अर्ज करणाऱ्या अर्जदारांना आता आधार आयडेंटिफिकेशन आवश्यक असेल. यासह केवायसी प्रक्रिया देखील सोपी करण्यात आली आहे.

इतकेच नाही तर बँक आणि फायनशिअल इस्टीट्युशन, ओटीपी, व्हिडिओ केवायसी किंवा समोर बसून व्हेरिफिकेशन करता येणार आहे. यामुळे ही प्रक्रिया पेपरलेस होईल.

आधार कार्ड बनवण्याच्या शुल्कात बदल

ड्रेमोग्राफिक अपडेटसाठी ( नाव, पत्ता, जन्मतारीख, मोबाईल,इमेल)

- ७५ रुपये

बायोमॅट्रिक अपडेट - ( फिंगरप्रिंट, आयरिस स्कॅन, फोटो) - १२५ रुपये

५ ते ७ वर्ष आणि १५ ते १७ वर्षाच्या मुलाचे आधारकार्ड ड्रेमोग्राफिक अपडेट - मोफत करता येणार

कागदपत्र अपडेट - सेंटर्सवर ७५ रुपये लागतील. तर १४ जूनपर्यंत ऑनलाइन मोफत असेन.

आधार कार्ड का प्रिंट- ४० रुपये

जर तुम्हाला तुमचे आधार कार्ड घरी बनवायचे असेल, तर पहिल्या सदस्यासाठी ७०० रुपये आणि त्याच पत्त्यावर येणाऱ्या प्रत्येक अतिरिक्त सदस्यासाठी ३५० रुपये अतिरिक्त शुल्क आकारले जाईल

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com