

लग्नाच्या हंगामात सोने-दागिने खरेदी करणाऱ्यांना या घसरणीचा मोठा फायदा होणार
दिवाळीनंतर सोन्याच्या दरात मोठी घसरण
आंतरराष्ट्रीय बाजारातील बदलांमुळे सोन्याच्या दरावर परिणाम
दिवाळीसंपताच सामान्य लोकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. चांदीनंतर आता सोन्याच्या दरात मोठी घसरण होणार असल्याचं सागंतिलं जात आहे. काही दिवसांपूर्वीपर्यंत सोने-दागिन्याचे दर गगनाला भिडले होते, आता अचानक दरात घसरण होत आहे. सोन्याचे दर विक्रमी उच्चांकावरून १.२१ लाख प्रति १० ग्रॅमवर आले आहेत, जे काही काळापूर्वी हे दर १.३२ लाखांवर पोहोचले होते.
या घसरणीमुळे लग्नाच्या हंगामासाठी सोने खरेदी करणाऱ्यांना फायदा होणार आहे. दरम्यान आता सोन्याच्या किमती अजून किती कमी होतील आणि का कमी होणार आहे हे जाणून घेऊ.
तज्ज्ञांच्या मते, आंतरराष्ट्रीय बाजारात इतकी मोठी उलथापालथ होते तेव्हा त्याचा परिणाम भारतातील सोन्याच्या किमतींवर होत असतो. भारतात १.३२ लाख रुपयांवरून १.२१ लाख रुपयांपर्यंतची घसरण ही या जागतिक घसरणीचा परिणाम आहे. ही घसरण तांत्रिक सुधारणा आहे. जेव्हा एखादी गोष्ट खूप लवकर आणि खूप जास्त वाढते, तेव्हा थोडीशी घसरण होते हे स्वाभाविक असते. हा बाजार स्थिर करण्याचा एक मार्ग आहे.
गुंतवणूकदारांचे लक्ष सध्या सोन्यापासून दूर जात आहे. अमेरिका-भारत व्यापार करार आणि अमेरिका-चीन चर्चेबद्दलच्या सकारात्मक बातम्यांमुळे बाजाराची जोखीम घेण्याची क्षमता वाढलीय. याचा अर्थ गुंतवणूकदार आता सोन्यासारख्या सुरक्षित गुंतवणुकीऐवजी शेअर बाजारासारख्या जोखमीच्या गुंतवणुकीकडे पाहताहेत, ज्यामुळे सोन्यावर दबाव वाढलाय. दरम्यान तज्ज्ञांच्या मते, ही घसरण खरेदीदारांसाठी एक संधी असू शकते.
कारण लग्नाच्या हंगामाच्या मागणीमुळे किमती पुन्हा वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे सोन्याचे दर १ लाखांपेक्षा कमी होतील असा अंदाज अवास्तव वाटते.
चांदीच्या किमतीत घट झाल्यामुळे सराफाच्या दुकानात ग्राहकांची गर्दी पाहायला मिळालीय. १६ ऑक्टोबर ते २५ ऑक्टोबर दरम्यान, चांदीच्या किमतीत अंदाजे ३५ हजाराची घट झालीय. आज भारतात १०० ग्रॅम चांदीची किंमत अंदाजे १५,५०० आहे. तर, १ किलो चांदीची किंमत अंदाजे १५५,००० इतकी आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.