
आधार कार्ड हे प्रत्येकासाठी महत्त्वाचे कागदपत्र आहे. आधार कार्डसाठी आता लवकरच नवीन अॅप लाँच करण्यात येणार आहे. ई-आधार अॅपद्वारे अनेक कामे सोपी होणार आहेत. तुम्ही अवघ्या काही मिनिटांत अनेक सरकारी कामे करु शकणार आहात. या नवीन E-Aadhaar अॅपचे उद्दिष्ट हे आहे की आधार कार्डची सर्व कामे ऑनलाइन व्हावेत. या कामांसाठी नागरिकांना ऑफलाइन पद्धतीने फेऱ्या घालाव्या लागू नयेत. म्हणून ही ऑनलाइन प्रोसेस सुरु करण्यात येणार आहे.
या नवीन E-Aadhaar अॅपद्वारे तुम्ही नाव, पत्ता, जन्मतारीख अशा अनेक गोष्टी ऑनलाइन अपडेट करु शकणार आहेत. यामुळे UIDAI अॅपवर ताण कमी होईल. आधार कार्डच्या कामांसाठी एक स्वतंत्र आधार अॅप सुरु करण्यात येणार आहे. दरम्यान, हे अॅप कसं असणार आहे ते जाणून घ्या.
E-Aadhaar अॅप काय आहे? (What Is E-Aadhaar App)
हे नवीन E-Aadhaar अॅप आधारशी सर्व कामांसाठी उपलब्ध आहे. ई आधारमध्ये अनेक फीचर्स आहेत. यामध्ये तुम्हाला आधार कार्डची सॉफ्ट कॉपी मिळणार आहे. यामध्ये तुम्हाला अनेक गोष्टी अपडेट करता येणार आहे. मिडिया रिपोर्टनुसार, या वर्षाअखेर हे अॅप लाँच केले जाऊ शकते.
अॅपचे फीचर्स (E-Aadhaar App Features)
या अॅपमध्ये तुम्हाला पत्ता, जन्मतारीख, फोन नंबर ही माहिती स्मार्टफोनवर अपडेट करता येणार आहे. याचसोबत या अॅपमध्ये जन्म प्रमाणपत्र, पॅन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, रेशन कार्ड, मनरेगा रेकॉर्ड, वीज बिल ही सर्व माहिती युजर्सच्या अॅपमध्ये आपोआप दिसणार आहे.
एआय आणि फेसआयडी
मिडिया रिपोर्टनुसार, या अॅपमध्ये एआय आणि फेस आयडी या टेक्नोलॉजीचा समावेश असणार आहे. या आधार कार्डद्वारे अनेक कामे जलद पूर्ण हणार आहे. सध्या ही कामे करण्यासाठी काही दिवसांचा वेळ द्यावा लागतो. परंतु अॅपमुळे काही मिनिटांत ही कामे होणार आहेत.
या अॅपची ट्रायल किंवा अर्ली अॅक्सेस तुम्ही गुगल प्ले स्टोअरवर जाऊन घेऊ शकतात. तुम्ही ऑनलाइन अॅप डाउनलोड करु शकतात. तुम्ही लॉग इन करुन फीचर्सचा वापर करु शकतात.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.