Aadhaar Card: कुणाचे आधार कार्ड ब्लॉक केले जात आहेत? UIDAI ने १.१७ कोटी नंबर केले डीएक्टिवेट; कारण काय?

UIDAI Update: आधार कार्डबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. आधार कार्डचा गैरवापर केला जात असल्यामुळे UIDAIने मोठे पाऊल उचलले आहे. १.१७ कोटी आधार नंबर डीएक्टिवेट केले.
Aadhaar Card: कुणाचे आधार कार्ड ब्लॉक केले जात आहे? UIDAI ने आतापर्यंते १.१७ कोटी नंबर केले डीएक्टिवेट
Aadhaar Card Saam Tv
Published On

आधार कार्डबाबत महत्वाची बातमी समोर आली आहे. आधार कार्ड हे महत्वाचे दस्ताऐवज आहे. आधार कार्डशिवाय कोणतेच महत्वाचे काम होत नाही. भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाने म्हणजेच यूआयडीएआयने आतापर्यंत १.१७ कोटींपेक्षा जास्त १२ अंकी आधार नंबर निष्क्रिय केले आहेत. मृत्यू झालेल्या व्यक्तींच्या आधार कार्ड नंबरचा गैरवापर केला जाऊ नये यासाठी UIDAIने हे महत्वाचे पाऊल उचलले आहे.

UIDAI ने या उपक्रमांतर्गत २४ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये नोंदणीकृत मृत्यूंसाठी myAadhaar पोर्टलवर कुटुंबातील सदस्याच्या मृत्यूची तक्रार नोंदवण्याची एक नवीन सेवा सुरू केली आहे. या सेवेद्वारे कुटुंबातील सदस्याच्या मृत्यूबाबतीत एखादी व्यक्ती पोर्टलवर येऊन UIDAI ला माहिती देऊ शकेल. बुधवारी UIDAIने जारी केलेल्या अधिकृत निवेदनात असे म्हटले आहे की, आधार डेटाबेसची सतत अचूकता राखण्यासाठी, UIDAI विविध स्त्रोतांकडून मृत्यू नोंदी मिळविण्यासाठी आणि योग्य पडताळणीनंतर आधार क्रमांक निष्क्रिय करण्यासाठी हा उपाय अवलंबत आहे.

Aadhaar Card: कुणाचे आधार कार्ड ब्लॉक केले जात आहे? UIDAI ने आतापर्यंते १.१७ कोटी नंबर केले डीएक्टिवेट
Aadhaar Card Misuse: तुमच्या आधार कार्डवर कोणी कर्ज घेतलंय का? कसं आणि कुठे कराल तपास?

UIDAIने पुढे असे सांगितले की, त्यांनी भारताच्या रजिस्ट्रार जनरलला आधार नंबरशी जोडलेल्या मृत्यूच्या नोंदी शेअर करण्यास सांगितले आहे आणि नागरी नोंदणी प्रणाली वापरून २४ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधून सुमारे १.५५ कोटी मृत्यूच्या नोंदी मिळाल्या आहेत. योग्य पडताळणीनंतर यापैकी सुमारे १.१७ कोटी आधार नंबर निष्क्रिय करण्यात आले आहेत. जवळपास ६.७ लाख मृत्यूच्या नोंदींच्या आधार क्रमांक निष्क्रिय करण्याचे काम अजूनही सुरू आहे.

Aadhaar Card: कुणाचे आधार कार्ड ब्लॉक केले जात आहे? UIDAI ने आतापर्यंते १.१७ कोटी नंबर केले डीएक्टिवेट
Aadhaar Update: घरी बसून आधार कार्ड अपडेट करता येईल का? फोटो बदलण्याचे नियम समजून घ्या

'Reporting of Death of a Family Member' या अंतर्गत कुटुंबातील एखाद्या सदस्याचा मृत्यूच्या झाल्यानंतर मृतकाच्या कुटुंबातील कोणत्याही एका सदस्याचे त्या व्यक्तीसोबत काय नाते होते याचे प्रमाणपत्र द्यावे लागेल. पोर्टलवर ज्याचा मृत्यू झाला आहे त्याचा आधार क्रमांक, डेथ रजिस्ट्रेशन नंबर आणि काही दुसऱ्या डिटेल्सची माहिती द्यावी लागेल. तुम्ही दिलेल्या माहिती प्रथम पडताळणी केली जाईल आणि नंतर आधार कार्ड निष्क्रिय करण्याची प्रक्रिया सुरू होईल.

या कामासाठी UIDAI राज्य सरकारची मदत घेत आहे. पायलट प्रोजेक्ट म्हणून १०० वर्षांपेक्षा जास्त वयाच्या आधार कार्ड धारकांशी संबंधित माहिती राज्य सरकारांशी शेअर केली जात आहे. जेणेकरून ते जिवंत आहेत की नाही हे शोधण्यास मदत होईल. पडताळणी अहवाल मिळाल्यानंतरच आधार कार्ड क्रमांक निष्क्रिय केला जाईल.

Aadhaar Card: कुणाचे आधार कार्ड ब्लॉक केले जात आहे? UIDAI ने आतापर्यंते १.१७ कोटी नंबर केले डीएक्टिवेट
Blue Aadhaar Card: ब्लू आधार कार्ड म्हणजे काय? कोणासाठी असतं?, अपडेट करण्यास का सांगतंय सरकार?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com