ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
लहान मुलांच्या आधार कार्डला ब्लू आधार कार्ड असे म्हणतात.
केंद्र सरकार देशभरातील पालकांना त्यांच्या मुलांचे आधार कार्ड अपडेट करण्यास सांगत आहे.
केंद्र सरकारने पालकांना आवाहन केले आहे की, ७ वर्ष पूर्ण झालेल्या मुलांचे आधार कार्ड अपडेट करावे.
5 वर्षाखालील मुलांसाठी आधार कार्ड काढले जाते, त्याला बाल आधार कार्ड म्हणतात. बाल आधार कार्ड हे निळ्या रंगाचे असते.
नवजात बालकाचे आधार कार्ड बनवण्यासाठी नवजात बालकाचा जन्म दाखला आणि पालकांचे आधार कार्ड असणे आवश्यक आहे.
बाल आधार कार्डमध्ये मुलांचे बायोमेट्रिक माहिती (फिंगरप्रिंट आणि डोळ्यांची स्कॅन) नोंदवले जात नाहीत.
५ वर्ष पूर्ण झाल्यावर ब्लू आधार कार्ड अपडेट करावे लागते. म्हणूनच केंद्र सरकार आवाहन करत आहे की, ७ वर्ष पूर्ण झालेल्या मुलांचे आधार कार्ड कोणत्याही परिस्थितीत अपडेट केले जावे.