Palghar Farmer Receives ₹2.30 Relief for Massive Crop Loss
Palghar Farmer Receives ₹2.30 Relief for Massive Crop LossSaam

सरकारकडून शेतकऱ्यांची थट्टा? नुकसान भरपाई म्हणून २ रूपये ३० पैसे बँक खात्यात जमा; बळीराजा नाराज

Palghar Farmer Receives ₹2.30 Relief for Massive Crop Loss: पालघरमधील वाडा तालुक्यात परतीच्या पावसाचं थैमान. पावसामुळे भातपीकाचे नुकसान. नुकसान भरपाई म्हणून शेतकऱ्याच्या बँक खात्यात फक्त 2.30 रूपये जमा.
Published on

पालघर जिल्ह्यातील वाडा तालुक्यात परतीच्या पावसानं अक्षरश: झोडपून काढलंय. हाता - तोंडाशी आलेला घास पावसानं हिरावून नेला. सोन्यासारखं आलेलं भातपीक अजूनही शेतात पडून आहे. त्यावर पाणी साचल्यानं भाताला कोंब फुटलंय. हजारो हेक्टर भातशेतीचं पावसामुळे नुकसान झाले आहे. अशा परिस्थितीत सरकारकडून नुकसान भरपाई मिळाली. पण ही नुकसान भरपाई थट्टा करणारी ठरली. नुकसान भरपाई म्हणून एका शेतकऱ्याच्या बँक खात्यात केवळ २ रूपये ३० पैसे जमा झाले आहे. याचा मेसेज मोबाईलवर आल्याने शेतकरी वर्गात तीव्र संताप उसळला आहे.

वाडा तालुक्याला भाताचे कोठार म्हणून संबाधले जाते. वाडा कोलम हा भाताचा वाण राज्यभर प्रसिद्ध असून, त्याला बाजारपेठेत चांगली मागणी आहे. यावर्षी समाधानकारक पाऊस पडल्याने भातपीक चांगले आले होते. सोन्यासारखे पीक आल्याने शेतकरी आनंदात होता. मात्र परतीच्या पावसाने शेतकऱ्यांची पुरती निराशा झाली.

Palghar Farmer Receives ₹2.30 Relief for Massive Crop Loss
पश्चिम महाराष्ट्रात काँग्रेसला खिंडार; २ बड्या नेत्यांकडून रामराम, भाजपचं कमळ हाती घेण्याचं निश्चित

सोन्यासारखे भातपीक अक्षरश: मातीमोल झाले. परतीच्या सततच्या पावसाने भातपीकाला झोडपून काढले. कापणीस आलेले भातपीक शेतात पडले. त्यावरून पाणी वाहून गेले. अनेक दिवसात पीक पाण्यात राहील्याने आता भाताला कोंब आले आहेत. भाताबरोबर पेंढाही काळा पडला आहे. त्यामुळे जनावरांना कोणता पेंढा खाऊ घालावा, यामुळे त्यांच्यावर उपासमारीची वेळ येऊ शकते, अशी भीती शेतकऱ्यांनी व्यक्त केली.

यानंतर शेतकऱ्यांनी सरकारकडे धाव घेतली.. सरकारने नुकसानीची पाहणी केली. तसेच पंचनामेही करण्यात आले. त्यानंतर काही शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात आली. वाडा तालुक्यातील शिल्लोत्तर येथील शेतकरी मधुकर बाबुराव पाटील या शेतक-याची एकूण ११ एकर शेती आहे. त्यांच्या नावावर सात एकर, पत्नी आणि मुलीच्या नावे चार एकर अशी जमीन आहे.

Palghar Farmer Receives ₹2.30 Relief for Massive Crop Loss
नवी मुंबईत सुसाट प्रवास, मुंबई-पुणे महामार्ग फक्त १० मिनिटांत; २,९०० कोटींच्या प्रकल्पाला हिरवा कंदील, कसा असेल ग्रीनफिल्ड एक्सप्रेस वे?

परतीच्या पावसामुळे मधुकर पाटील यांच्या शेतीचं प्रचंड नुकसान झालं. नुकसान भरपाई पोटी सरकारकडून २ रूपये ३० पैसे मिळाले, असं त्यांनी सांगितले. बँक खात्यात २ रूपये ३० पैसे जमा झाल्याचा मेसेज त्यांच्या मोबाईलमध्ये आला. हा मेसेज पाहून शेतकरी नाराज झाला. त्यांनी प्रसारमाध्यमांसमोर नाराजी व्यक्त केली. सरकारकडून शेतकऱ्यांची थट्टा केली जात आहे का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com