पश्चिम महाराष्ट्रात काँग्रेसला खिंडार; २ बड्या नेत्यांकडून रामराम, भाजपचं कमळ हाती घेण्याचं निश्चित

Big Blow to Congress in Solapur: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ऐन निवडणुकीच्या तोंडावर सोलापुरात काँग्रेसला मोठा धक्का. काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष प्रकाश पाटील आणि त्यांच्या पत्नी माजी पंचायत समिती सदस्य श्रीलेखा पाटील भाजपच्या वाटेवर.
Big Blow to Congress in Solapur
Big Blow to Congress in SolapurSaam
Published On
Summary
  • सोलापुराच्या माळशिरस तालुक्यात काँग्रेसला खिंडार

  • काँग्रेसचे माजी जिल्ह्याध्यक्ष आणि त्यांच्या पत्नी भाजपच्या वाटेवर.

  • पश्चिम महाराष्ट्रात भाजपची ताकद वाढली.

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सोलापुरात मोठी राजकीय घडामोड घडली आहे. काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष प्रकाश पाटील आणि त्यांच्या पत्नी माजी पंचायत समिती सदस्य श्रीलेखा पाटील यांनी पक्षाला सोडचिठ्ठी देण्याचा निर्णय घेतला आहे. लवकरच प्रकाश पाटील आणि श्रीलेखा पाटील भाजप पक्षात प्रवेश करतील. ऐन निवडणुकीच्या तोंडावर सोलापुरात काँग्रेसला हा मोठा धक्का मानला जात आहे.

पश्चिम महाराष्ट्रात सध्या भाजपकडून ऑपरेशन लोटस राबवण्यात येत आहे. ऑपरेशन लोटसमुळे भाजप पक्षात मोठ्या प्रमाणात इनकमिंग झाली आहे. गेल्या काही काळात अनेक नेत्यांनी आपल्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसह आपल्याला पक्षाला रामराम ठोकत भाजप पक्षात प्रवेश केला आहे. अशातच काँग्रेसचे आणखी दोन नेते भाजपच्या वाटेवर आहेत.

Big Blow to Congress in Solapur
ऑक्टोबर - नोव्हेंबरचा हप्ता एकत्र मिळणार? लाडकी बहीण योजनेबाबत मोठी अपडेट समोर

काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष प्रकाश पाटील आणि त्यांच्या पत्नी माजी पंचायत समिती सदस्य श्रीलेखा पाटील यांनी काँग्रेसला जय महाराष्ट्र करण्याचा निर्णय घेतला आहे. दोघांनीही भाजपचं कमळ हाती घेण्याचं निश्चित केलं आहे. माहितीनुसार, प्रकाश पाटील आणि त्यांचे शेकडो कार्यकर्ते सात नोव्हेंबरला भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत.

Big Blow to Congress in Solapur
शिवसेना शिंदे गटाच्या नेत्याविरोधात टीका करणं भोवलं, मनसे नेत्यावर हल्ला; नेमकं घडलं काय?

जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या उपस्थितीमध्ये हा पक्षप्रवेश सोहळा पार पडणार आहे. काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष प्रकाश पाटील हे विजयसिंह मोहिते पाटील यांचे पारंपारिक विरोधक मानले जात होते. पाटील यांच्या पक्ष प्रवेशानंतर माळशिरसमध्ये भाजपची ताकद आणखी वाढणार असल्याचं बोललं जात आहे.

Big Blow to Congress in Solapur
'लोकशाही टिकवण्यासाठी एक व्हावं लागेल'; शरद पवार नेमकं काय म्हणाले?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com