New Income Tax Act Saam Tv
बिझनेस

New Income Tax Act: करदात्यांसाठी महत्त्वाची बातमी! १ एप्रिलपासून नवीन आयकर कायदा लागू होणार; काय बदलणार?

New Income Tax Act 2025 Implemented From 1st April 2026: करदात्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. पुढच्या महिन्यापासून नवीन आयकर कायदा लागू होणार आहे. यामुळे अनेक गोष्टींमध्ये बदल होणार आहे.

Siddhi Hande

नवीन आयकर कायदा लागू होणार

१ एप्रिलपासून नवीन नियम लागू

करदात्यांना होणार फायदा

करदात्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. आता करदात्यांसाठी नवीन नियम लागू होणार आहेत. सेंट्रल बोर्ड ऑफ ट्रस्टीजने इन्कम टॅक्सच्या नवीन नियमांना २० मार्च रोजी अधिसूचना जारी केली आहे. यामुळे आता नवीन इन्कम टॅक्स नियम १ एप्रिलपासून लागू केले जाणार आहे. याचा थेट परिणाम कोट्यवधी करदात्यांवर होणार आहे. १ एप्रिल २०२६ पासून नवन आर्थिक वर्ष सुरु होणार आहे. तेव्हापासून नवीन नियम लागू होणार आहे.

नवीन आयकर कायदा (New Income Tax Act)

केंद्र सरकारने मागच्या वर्षीच्या अर्थसंकल्पात नवीन आयकर कायद्याची घोषणा केली होती.त्यानंतर आता इन्कम टॅक्स अॅक्ट २०२६ हा २०२६ पासून लागू होणार आहे. जवळपासून ६० वर्षांपूर्वीच्या आयकर कायदा बंद करण्यात आला आहे. आयकर कायदा, १९६१ मध्ये बदल केले आहे. नवीन आयकर कायदा हा खूप सोपा असणार आहे.

नियमांची संख्या ५११ वरुन ३३३ केली

नवीन इन्कम टॅक्स कायद्यात नियमांची संख्या ५११ वरुन ३३३ केली आहे. तसेच अर्जांची संख्या ३९९ वरुन १९० करण्यात आली आहे. यामुळे टॅक्स भरण्याची प्रोसेस खूप सोपी झाली आहे. या नवीन आयकर कायद्याची भाषा खूप सोपी आहे. तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, जुन्या नियमांमधील भाषा खूप अवघड होती. ही भाषणा करदात्यांना समजणे खूप अवघड होते. त्यामुळेच नवीन आयकर कायदा खूप सोपा केला आहे.

एचआरए क्लेमच्या नियमात बदल

नवीन नियमांनुसार हाउस रेंट अलाउन्सच्या नियमात बदल करण्यात आले आहे. यामध्ये एचएआरए बेनिफिट्सच्या शेअर्समध्ये वाढ केली आहे. यामध्ये हैदराबाद, पुणे, अहमदाबाद आणि बंगळुरुचा समावेश करण्यात आला आहे. यामध्ये शहरात राहणारे लोक पगारातील ५० टक्के एग्जेम्पशन लिमिटचा फायदा घेऊ शकतात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Extramarital Affair : अमेरिकेत पत्नीची हत्या, भारतातील गर्लफ्रेंडला फोटो; उच्चशिक्षित इंजिनिअरचं भयानक कृत्य

Smartphone Care Tips : फोनच्या स्क्रीनवर Liquid Detected चा इशारा येतो? मग टाळा या ७ चुका

Maharashtra News Live Update: पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री गणेश नाईक यांच्या ताफ्याला रस्त्यावर पडलेल्या खड्यांचा बसला फटका

शोल्डर बॅग्सच्या 5 लेटेस्ट डिझाईन्स; प्रत्येक आउटफिटला देतील स्टायलिश लूक

आदिवासी महिलेसोबत सामूहिक बलात्कार; नवऱ्याला शोधायला गेली अन् शेतात सापडला मृतदेह

SCROLL FOR NEXT