Metro Ticket Booking Saam Tv
बिझनेस

Metro Ticket Booking: मेट्रोच्या तिकीटासाठी रांगेत उभं राहायची गरज नाही; काही मिनिटात ऑनलाइन तिकीट काढा

Online Metro Ticket Booking: मेट्रोचं तिकीट काढायला लांबच लांब रांगा असतात. तुम्ही ऑनलाइन पद्धतीने किंवा व्हॉट्सअॅपवरुन तिकीट बुक करु शकतात.

Siddhi Hande

मुंबई हे स्वप्नांचे शहर आहे.मुंबईत सर्वजण धावपळीचे जीवन जगत असतात.मुंबईत अनेक लोक पब्लिक ट्रान्सपोर्टचा वापर करतात. यात सर्वात जास्त मुंबई लोकल, मेट्रो आणि बसचा समावेश असतो. मेट्रोने किंवा ट्रेनने प्रवास करताना तिकीटसाठी लांबच लांब रांगा असतात. परंतु तुम्ही ऑनलाइन पद्धतीने तिकीट काढू शकतात.

मेट्रो स्टेशनवर तिकीट काढण्यासाठी खूप रांगा असतो. त्यामुळे तिकीट काढतानाचा वेळ वाया जातो. परंतु तुम्ही तुमच्या मोबाईलवर तिकीट काढू शकतात. किंवा व्हॉट्सअॅपच्या मदतीनेही मेट्रोचे तिकीट काढू शकतात.

व्हॉट्सअॅपच्या मदतीने तिकीट बुकींग

मेट्रो तिकीट बुक करण्यासाठी प्रवाशांना ९६७०००८८८९ या नंबरवर hi असा मेसेज पाठवायचा आहे. त्यानंतर तुम्हाला तुमचे ठिकाण निवडा त्यानंतर ऑनलाइन पद्धतीने पेमेंट करा.त्यानंतर तुम्हाला व्हॉट्सअॅप लिंक आणि क्यूआर कोड पाठवण्यात येईल. हा कोड स्कॅन करुन तुम्ही प्रवास करु शकतात.

Mumbai 1 app

तुम्ही मेट्रोच्या अधिकृत अॅपवरुन अवघ्या काही मिनिटांत तिकीट बुक करु शकतात. यामध्ये तुम्हाला तुमच्या तिकीटाची संपूर्ण माहिती मिळेल. तुम्ही गुगल प्ले स्टोअरवर जाऊन हा अॅप डाउनलोड करु शकतात. (Metro Online Ticket Booking)

Ridlr अॅप

तुम्ही Ridlr अॅपवरुनदेखील तिकीट बुक करु शकतात. यावर तुम्हाला सिंगल, रिटर्न अशा दोन्ही पद्धतीने तिकीट बुक करता येईल. तसेच मेट्रोचा पासदेखील काढता येईल. हा अॅप तुम्ही अॅपल स्टोअरमधून डाउनलोड करु शकतात. (Mumbai Metro Ticket Booking)

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Exit Poll: मलकापूर विधानसभेत काँग्रेसचे राजेश एकाडे होणार आमदार? पाहा Exit Poll

Bhandara Crime : धक्कादायक.. अपशब्द बोलल्याने मालकाने केली कामगाराची हत्या; नदीत फेकला होता मृतदेह

Winter Wedding Tips: हिवाळ्यात लेहेंगा आणि साडीसह वापरा अशी जॅकेट आणि शाल ... ज्याने येईल ट्रेंडी लुक; थंडीपासूनही होईल बचाव

Saam Exit Poll: शिरपूर विधानसभा मतदारसंघामध्ये भाजपमधून काशीराम पावरा मारणार बाजी? पाहा Exit Poll

Maharashtra Exit Polls : कसबा पेठमधून कोण निवडून येणार? रविंद्र धंगेकर की हेमंत रासने? पाहा एक्झिट पोल

SCROLL FOR NEXT