तबरेज शेख
नाशिक : नाशिक शहरात मोबाईल दुकानांमध्ये अँपल कंपनीच्या मोबाईलचे ऍक्सेसरीज विक्री केली जात होती. याबाबत भद्रकाली पोलिसांना माहिती मिळाल्यानंतर त्या मोबाईल दुकानांवर धाड टाकत कारवाई केली आहे. साधारण पाच दुकानांवर कारवाई करत तेथील बनावट साहित्य जप्त केले आहे.
नाशिकच्या (Nashik) एमजी रोडवरील दुकानावर हि कारवाई करण्यात आली आहे. या दुकानातून अँपल कंपनीच्या बनावट अँक्सेसरीज विक्री केली जात असल्याबाबत नाशिकच्या भद्रकाली पोलिसांत तक्रार दाखल होती. या तक्रारीवरून सदरच्या मोबाईल दुकानांमध्ये पोलिसांनी (Police) धाड टाकत कारवाई केली. यात परिसरातील मॉजीसा मोबाईल, एजीएम कॉर्पोरेशन, रिद्धी सिद्धी एम्पेक्स, बालाजी मोबाईल, आशापुरा मोबाईल या दुकानांमध्ये पोलिसांनी तपासणी करत कारवाई केली आहे.
साडेतीन लाखाचा मुद्देमाल जप्त
अँपल कंपनीच्या बनावट अँक्सेसरीज विक्री होत असल्याबाबत कल्याणमधील रहिवाशी कुंदन बेलोशे यांनी भद्रकाली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. या तक्रारीची दखल घेत करण्यात आलेल्या कारवाई पोलिसांनी पाच दुकानदारांना अटक केली आहे. तसेच दुकानातून ३ लाख ५२ हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे. एमजी रोडवरील पाच दुकानांमध्ये पोलिसांनी कारवाई केल्याने खळबळ उडाली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.