Ladki Bahin Yojana canva
बिझनेस

Ladki Bahin Yojana : पात्र असतानाही ₹१५०० बंद; घरात कार नाही, तरीही नावावर नोंद कशी? लाडक्या बहि‍णींचा संताप

Ladki Bahin Yojana Maharashtra : लाडकी बहीण योजनेत पात्र असूनही अनेक महिलांच्या खात्यात ₹1500 चा हप्ता जमा झालेला नाही. ई-केवायसी, वाहन नोंद आणि पोर्टल त्रुटींमुळे महिलांमध्ये संताप वाढला आहे.

Namdeo Kumbhar

Ladki Bahin Yojana payment 1500 installment stopped : राज्यातील लाडक्या बहि‍णींच्या खात्यावर मार्च आणि एप्रिल महिन्याचे ३००० रुपये जमा झाले आहेत. पण राज्यातील अनेक महिलांच्या खात्यात जानेवारीपासून १५०० रूपयांचा हप्ता जमाच झालेला नाही. पात्र असतानाही लाभ बंद का झाला? असा सवाल संतप्त महिलांकडून उपस्थित केला जात आहे. काही महिलांच्या घरात कार नाही, पण नावावर मात्र वाहनांची नोंद झाल्याच्या तक्रारीही समोर आल्या आहेत. ईकेवायसी केली, ती दुरूस्तही केली, पण खात्यावर एकही हप्ता जमा झालेला नाही, अशी खंत लाडक्या बहि‍णींनी मांडली आहे.

पात्र असतानाही लाडक्या बहि‍णींच्या खात्यावर पैसे आले नाही, अशा राज्यातील प्रत्येक शहरात अन् गावातून तक्रारी आल्या आहेत. आम्ही पात्र आहोत, ईकेवायसीही केली पण पैसे का बंद झाले? असा सवाल उपस्थित होत आहे. प्रत्येक गावातील महिलांमध्ये खात्यावर पैसे न आल्यामुळे नाराजी आहे. सोलापूर, जालना जिल्ह्यात तर महिला आणि बाल कल्याण विभागाच्या कार्यालयात महिला धडकल्या. सोलापूर जिल्ह्यातील महिला आणि बाल कल्याण कार्यालयात २ हजारांपेक्षा जास्त महिलांनी धडक दिली. पात्र असताना आमचा लाभ बंद का झाला? असा एकच जाब सर्व महिला विचारत होत्या. लाडक्या बहि‍णींचे प्रश्न ऐकून अधिकारीही भांबावले होते. त्यांच्याकडे उत्तरच नव्हते. पण ही फक्त सोलापूरची परिस्थिती नाही, तर संपूर्ण राज्यातच अनेक पात्र महिलांच्या खात्यात पैसे आले नसल्याचे समोर आले आहे.

जानेवारी २०२६ पासून राज्यातील अनेक महिलांच्या खात्यात लाडकी बहीण योजनेचा हप्ता जमा झालेला नाही. लाभ न मिळणाऱ्या महिलांची संख्या अर्ध्या कोटींपेक्षा जास्त आहे. त्यामध्ये फक्त सोलापूरमधील ४ लाख महिलांचा समावेश आहे. अनेक महिलांना फेब्रुवारीपर्यंत पैसे आले होते, तर काहींना जानेवारीनंतर एकही हप्ता मिळाला नाही. ३ महिन्यानंतर लाडक्या बहि‍णींच्या खात्यावर मार्च-एप्रिलचा हप्ता जमा झाला. पण अनेक महिलांना पैसे मिळालेच नाहीत. त्यामुळे संतप्त महिला सोलापूर जिल्ह्यातील महिला आणि बाल विकास कार्यालयात जाऊन जाब विचारला.

चारचाकी वाहन नसावे ही योजनेतील अट आहे. अनेक महिलांकडे चार चाकी वाहन नाही, पण तरही पोर्टलवर त्या महिलेच्या नावावर चारचाकी वाहन असल्याचे दाखवत आहे. यावर महिलांकडून आरटीओ कार्यालयाकडेही विचारना केली. त्यावेळी महिलेच्या नावार वाहन नसल्याचे नोंद असल्याचे सांगण्यात येतेय. पण मग पोर्टलवर महिलेच्या नावावर वाहनाची नोंद झालीच कशी? त्यामुळे पैसे बंद झाले? याला जबाबदार कोण?? इतकेच नाही तर एकाच कुटुंबातील दोनपेक्षा जास्त महिला असल्याचे दाखवले जातेय, ‘ई-केवायसी’ चुकीची केली, वय कमी किंवा जास्त असल्याची कारणे पोर्टलवर दाखविली जात आहेत. धक्कादायक म्हणजे, अनेक महिलांचे उत्पन्न २ लाखांच्या आत असताना पोर्लटवर आयकरदाते म्हणून नोंद झाली आहे. त्यामुळे राज्यातील महिला संतप्त असून राज्य सरकार काय निर्णय घेणार? याकडे सर्वांच्या नजरा खिळल्या आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Jennifer Winget: १२ वर्षांपूर्वी मोडलं पहिलं लग्न, आता सिंगापूरच्या उद्योगपतीसोबत दुसऱ्यांदा संसार थाटणार ही फेमस अभिनेत्री

Famous Singer Death : प्रसिद्ध गायकाचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन, संगीत विश्वावर शोककळा

Maharashtra News Live Update: पुण्यातील अनधिकृत हाऊस पार्टी प्रकरणातील सर्व तरुणांच्या पालकांना पोलीस पाठवणार नोटीस

Daily cumin water benefits: जिऱ्याचं पाणी प्यायल्याने खरंच पचनक्रिया सुधारते? डॉक्टरांनी सांगितलं सत्य

मोठी बातमी! बड्या नेत्याला नेपाळ बॉर्डवर अटक; राजकीय वर्तुळात खळबळ

SCROLL FOR NEXT