ना गाडी, ना ट्रेन...थेट १ हजार किलोमीटर पायी प्रवास! महाराष्ट्रातून निघालेल्या 'या' चाहत्याची सोशल मीडियावर जोरदार चर्चा!

Vijay Thalapathy Fan: विजय थलापतींचा ५० वर्षीय चाहता यादव हेगडोळे यांनी देगलूरहून चेन्नईपर्यंत एक हजार किमी पदयात्रा सुरू केली. नवस फेडत थलापतींची भेट घेण्याचा त्यांचा निर्धार आहे.
Vijay Thalapathy Fan
Vijay Thalapathy Fansaam Tv
Published On

Vijay Thalapathy: साऊथचे सुपरस्टार आणि तामिळनाडूचे मुख्यमंत्री विजय थलापती यांचे लाखो फॅन्स आहेत. जे आजही त्यांच्या एका झलकची आतुरतेने वाट पाहत असतात. त्यांच्या असाच एक जबरा चाहता आपल्या आवडत्या अभिनेत्याला भेटण्यासाठी तब्बल एक हजार किलोमीटरची पदयात्रा करत तामिळनाडूच्या दिशेने निघाला आहे. नांदेड जिल्ह्यातील देगलूर तालुक्यातील नरसी शेळगाव येथील ५० वर्षीय यादव हेगडोळे यांनी विजय थलापती यांना भेटण्याचा निर्धार केला आहे.

मुख्यमंत्री व्हाव म्हणून केला नवस

यादव हेगडोळे हे विजय थलापती यांचे खूप मोठे चाहते आहेत. यंदा तामिळनाडूमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत विजय थलापती यांनी निवडणूक लढवली होती. त्यावेळी थलापती मुख्यमंत्री झाले तर देगलूरहून तामिळनाडूपर्यंत पायी पदयात्रा करण्याचा नवस यादव यांनी केला होता. आता आपला नवस पूर्ण करण्यासाठी त्यांनी ही पदयात्रा सुरू केली आहे.

Vijay Thalapathy Fan
Amey Wagh Movie: 'इच्छा पूर्ण होतील, पण...'; अमेय वाघचा 'बायंगी' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

विजय थलापतींना भेटण्याची इच्छा

यादव हेगडोळे यांची केवळ नवस फेडण्याची इच्छा नाही, तर आपल्या आवडत्या कलाकाराची प्रत्यक्ष भेट घेण्याचीही त्यांची इच्छा आहे. विजय थलापती मुख्यमंत्री झाल्यानंतर यादव यांनी त्यांच्या मंत्रालयाशी संपर्क साधल्याचे सांगितले. मंत्रालयाकडून त्यांना भेटीसाठी येण्याबाबत ई-मेल प्राप्त झाल्याचा दावा यादव यांनी केला आहे. त्यामुळे आता चेन्नईला पोहोचल्यानंतर विजय थलापती यांची भेट होईल, अशी त्यांना आशा आहे.

Vijay Thalapathy Fan
Kangana Ranaut: '...आता का चर्चेपासून पळता?'; कंगना रणौत यांची राहुल गांधींवर सडकून टीका

गावकऱ्यांनी दिल्या शुभेच्छा

यादव हेगडोळे यांनी सोमवारी दुपारी देगलूर येथून आपल्या पदयात्रेला सुरुवात केली. यावेळी गावकरी आणि मित्रमंडळींनी त्यांना शुभेच्छा देत यात्रेसाठी निरोप दिला. विजय थलापती यांना भेटण्यासाठी सुरू केलेली ही पदयात्रा तब्बल एक हजार किलोमीटरची असणार आहे. देगलूर ते चेन्नई असा पायी प्रवास करत यादव तामिळनाडूला पोहोचणार आहेत. आपल्या आवडत्या कलाकारासाठी एवढा मोठा पायी प्रवास करण्याचा निर्णय घेतल्याने त्यांच्या या अनोख्या भक्तीची चर्चा रंगली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com