

लाडक्या बहिणींच्या खात्यात मार्च-एप्रिलचा हप्ता जमा
लाडक्या बहिणींना मे महिन्याचा हप्ता कधी मिळणार?
या दिवशी खात्यात पैसे जमा होण्याची शक्यता
लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना मार्च आणि एप्रिल महिन्याचा हप्ता मिळालेला आहे. या दोन्ही महिन्याचा हप्ता लांबणीवर गेला आहे. जवळपास दोन महिन्यांनी मार्चचा हप्ता जमा करण्यात आला आहे. त्यानंतर आता मे महिन्याच्या हप्त्याची चर्चा सुरु झाली आहे. मे महिन्याचा हप्ता कधी येणार असा प्रश्न विचारला जात आहे.
या दिवशी खात्यात येऊ शकतात पैसे (Ladki Bahin Yojana May Installment Date)
मे महिना सुरु होऊन आता २० दिवस झाले आहेत. तरीही मे महिन्याच्या हप्त्याबाबत कोणतीही अपडेट समोर आलेली नाही. त्यामुळे या महिन्याचा हप्ता कधी येणार असा मोठा प्रश्न लाभार्थ्यांसमोर आहे. मे महिन्याच्या शेवटच्या दोन आठवड्यात पैसे येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दरम्यान, अजूनही याबाबत अधिकृत माहिती समोर आलेली नाही.
लाडकी बहीण योजनेचा मे महिन्याचा हप्ता लांबणीवर जाणार? (Ladki Bahin Yojana May Installment May Delay)
गेल्या अनेक महिन्यांपासून लाडकी बहीण योजनेचा हप्ता लांबणीवर जात आहे. त्यामुळे या महिन्याचाही हप्ता लांबणीवर जात आहेत. त्यातच मे महिन्यात महिलांच्या खात्यात दोन महिन्याचे प्रत्येकी ३००० रुपये जमा करण्यात आले आहेत. त्यामुळे या महिन्याचा हप्ता लांबणीवरदेखील जाऊ शकतो. हप्ता लांबणीवर गेला तर महिलांना पुढच्या महिन्यात पैसे मिळू शकतात.
फक्त या महिलांनाच मिळणार लाभ
लाडकी बहीण योजनेतून लाखो महिलांचे अर्ज बाद करण्यात आले आहेत. काही महिलांना योजनेचा लाभ मिळत नाहीये. यामागचे कारण म्हणजे निकषात न बसणे आणि केवायसी. ज्या महिला निकषात बसत नाही त्यांचा लाभ बंद केला आहे. याचसोबत सर्व लाभार्थ्यांना केवायसी करणे अनिवार्य होते. केवायसी न केलेल्या महिलांचाही लाभ कायमचा बंद करण्यात आला आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.