पुण्यात ब्रिटनहून आलेला 'तो' धर्मगुरू अन् चर्चमधील 'ते' रहस्यमय प्रवचन! नव्या कायद्यांतर्गत महाराष्ट्रातली पहिलीच मोठी कारवाई

Maharashtra Freedom of Religion Act : पुण्यातील गुरुवार पेठेतील चर्चमध्ये प्रवचनाच्या माध्यमातून धर्मपरिवर्तनाचा प्रयत्न केल्याचा आरोप करत ब्रिटिश नागरिक असलेल्या धर्मगुरूविरोधात खडक पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
Pune church linked to alleged religious conversion case involving British citizen
British citizen booked in Pune religious conversion caseAI Image
Published On

Pune religious conversion case : पुण्यातील गुरुवार पेठ भागातील एका चर्चमध्ये प्रवचनाच्या माध्यमातून धर्मपरिवर्तनाचा प्रयत्न झाल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणी हिंदुत्ववादी संघटनांच्या तक्रारीवरून खडक पोलीस ठाण्यात एका ब्रिटिश नागरिक असलेल्या धर्मगुरूविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य अधिनियमाला विधिमंडळाची मंजुरी मिळाल्यानंतर या नव्या कायद्यांतर्गत पुण्यात दाखल झालेल्या पहिल्या गुन्ह्यांपैकी हे एक प्रमुख प्रकरण मानले जात आहे. (British citizen booked in Pune religious conversion case)

हिंदुत्ववादी संघटनांच्या कार्यकर्त्यांनी दिलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी संबंधित व्यक्तीविरोधात गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे. प्रवचनादरम्यान नेमक्या कोणत्या स्वरूपाच्या धार्मिक गोष्टी सांगण्यात आल्या, त्याद्वारे धर्मपरिवर्तनाचा प्रत्यक्ष प्रयत्न झाला का, तसेच संबंधित परदेशी नागरिकाला भारतात वास्तव्यादरम्यान धार्मिक प्रचार किंवा प्रवचन करण्याची कायदेशीर परवानगी होती का? या सर्व बाबींचा पोलीस शोध घेत आहेत.

Pune church linked to alleged religious conversion case involving British citizen
Maharashtra Cabinet : मुद्रांक शुल्कात मोठी सूट, फडणवीस सरकारनं घेतले ८ धडक निर्णय, वाचा एका क्लिकवर

मूळचा महाराष्ट्रातील, पण ब्रिटिश नागरिकत्व

मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित व्यक्ती मूळची महाराष्ट्रातील असली, तरी सध्या तिच्याकडे ब्रिटनचे नागरिकत्व आहे आणि ती भारतात राहत नाही. गेल्या काही दिवसांपासून ही व्यक्ती पुण्यात वास्तव्यास होती. गुरुवार पेठेतील एका चर्चमध्ये तिने आजवर अनेक प्रवचने आणि धार्मिक कार्यक्रम घेतल्याची माहिती समोर आली आहे. मात्र, या कार्यक्रमांच्या आधारे भाविकांना फूस लावून धर्मपरिवर्तनासाठी प्रवृत्त केले जात असल्याचा आरोप तक्रारदारांनी केला आहे. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर हिंदू संघटनांनी खडक पोलीस ठाण्यात धाव घेतली होती.

Pune church linked to alleged religious conversion case involving British citizen
भाजप सरपंचाची शेतात गळफास घेऊन आत्महत्या; आरोपीही भाजपचाच निघाला; राज्यात खळबळ

कायद्याच्या तरतुदी अन् पोलिसांचा तपास

महाराष्ट्रात धर्मांतरविरोधी नव्या कायद्याला मंजुरी मिळाल्यानंतर या कायद्याच्या अंमलबजावणीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. मात्र, संबंधित व्यक्तीने प्रत्यक्षात धर्मपरिवर्तनाचा प्रयत्न केला होता का, प्रवचनात नेमके काय समाविष्ट होते आणि या प्रकरणात कायद्याच्या कोणत्या तरतुदी लागू होतात, हे पोलीस तपासानंतरच स्पष्ट होणार आहे.

Pune church linked to alleged religious conversion case involving British citizen
मोठी बातमी! विजयसिंह देशमुख यांची तडकाफडकी बदली, अविनाश रणखांब यांच्याकडे नवीन जबाबदारी

पुण्यात नव्या कायद्यांतर्गत दोन गुन्हे दाखल

दरम्यान, पुणे शहरात 'महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य अधिनियमांतर्गत' आतापर्यंत दोन गुन्हे दाखल झाल्याची माहिती विशेष शाखेचे पोलीस उपायुक्त डॉ. प्रशांत अमृतकर यांनी दिली. यातील पहिला गुन्हा ५ ऑगस्ट रोजी फुरसुंगी पोलीस ठाण्यात, तर दुसरा गुन्हा ९ ऑगस्ट रोजी खडक पोलीस ठाण्यात दाखल झाला आहे. फुरसुंगी येथील पहिल्या प्रकरणात फिर्यादीच्या मुलीवर अत्याचार करून तिला जबरदस्तीने धर्मांतरासाठी प्रवृत्त केल्याचा आरोप आहे. सध्या पोलीस दोन्ही प्रकरणांचा सखोल तपास करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com