

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्र्यांच्या हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड
उड्डाण घेतल्यानंतर काही सेकंदांत तांत्रिक बिघाड झाला
बिघाड लक्षात येताच पायलटने कोलाघाट येथे हेलिकॉप्टरचे एमर्जन्सी लँडिंग केले
मुख्यमंत्री कोलकाताहून पश्चिम मेदिनीपूरमधील केशपूरला जात होते
पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री सुवेंदू अधिकारी यांच्या हेलिकॉप्टरचे तांत्रिक बिघाड झाला. उड्डाण घेतल्यानंतर काही सेकंदात हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याचे लक्षात येताच पायलटने एमर्जन्सी लँडिंग केले. मंगळवारी पश्चिम बंगालच्या कोलाघाट येथे ही घटना घडली. मुख्यमंत्री सुवेंदू अधिकारी हे कोलकातावरून पश्चिम मेदिनीपूर येथील केशपूरला जात होते. मुख्यमंत्र्यांच्या हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड झाल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.
रिपोर्टनुसार, मुख्यमंत्र्यांच्या हेलिकॉप्टरमध्ये कोलकाता विमानतळावरून उड्डाण करण्यापूर्वीच तांत्रिक बिघाड दिसून आला होता. मात्र, काही वेळातच ही अडचण दूर करण्यात आली, त्यानंतर हेलिकॉप्टरने सकाळी ११ वाजून २१ मिनिटांनी उड्डाण केले. या सुरुवातीच्या तांत्रिक बिघाडाबाबत सध्या विमानतळ प्राधिकरणाकडून कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया समोर आली नाही.
उड्डाण केल्यानंतर काही वेळातच म्हणजे साधारण दुपारी १२ वाजता हेलिकॉप्टरमध्ये पुन्हा अचानक तांत्रिक बिघाड झाल्याचे समोर आले. दुसरीकडे, मेदिनीपूरमध्ये मुसळधार पाऊस आणि खराब हवामानामुळे तिथे हेलिकॉप्टर उतरवणे शक्य नव्हते. ही परिस्थिती लक्षात घेता कोलाघाट येथील हेलिपॅडवर हेलिकॉप्टर सुरक्षितपणे उतरवण्याचा निर्णय घेण्यात आला.
स्वातंत्र्यसैनिक खुदीराम बोस यांचा हुतात्मा दिन आहे. याच निमित्ताने मुख्यमंत्री सुवेंदु अधिकारी त्यांना आदरांजली वाहण्यासाठी त्यांचे जन्मस्थान असलेल्या केशपूरमधील मोहबनी गावात जात होते. मोहबनीमध्ये मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्याबाबत ग्रामस्थांमध्ये प्रचंड उत्साह होता. तिथे त्यांच्यासाठी एक तात्पुरता हेलिपॅडही तयार करण्यात आला होता, ज्याची पाहणी पोलीस अधीक्षक पापिया सुलताना यांनी केली होती. मुख्यमंत्र्यांच्या सुरक्षेत तैनात असलेल्या एसपीजीनेही सुरक्षा व्यवस्थेचा अनेकदा आढावा घेतला होता
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.