

कांचरापाडा येथे ममता बॅनर्जींच्या ताफ्यावर गोंधळ आणि हल्ल्याची घटना
आंदोलकांकडून दगडफेक, चिखलफेक आणि बूट फेकल्याचा आरोप
घटनेमुळे उत्तर २४ परगणा परिसरात तणाव निर्माण झालाय.
पश्चिम बंगालमधील कांचरापाडा येथे रविवारी मोठा गदारोळ झाला. कांचरापाडा येथील आंदोलकांनी ममता बॅनर्जींच्या ताफ्यावर दगडफेक केली. कोणी वाहनावर चिखल फेकला तर कोणी त्यांच्या कारवर बूट फेकून मारलाय. या घटनेनंतर बॅनर्जी यांनी माध्यमांशी संवाद साधला. "जर ते मला लागले असते, तर माझे डोके फुटले असते, असं माजी मुख्यमंत्री म्हणाल्या.
पश्चिम बंगालच्या उत्तर २४ परगणा जिल्ह्यात असलेल्या हलीशहर भागात स्थानिक रहिवासी आणि आंदोलकांनी माजी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या ताफ्यावर हल्ला केलाय. ममता बॅनर्जी ह्या मृत टीएमसी कार्यकर्ता बिरजू केओतच्या कुटुंबियांना भेट देण्यासाठी गेल्या होत्या. या टीएमसी कार्यकर्त्याचा हलीशहर पोलिसांच्या कोठडीत मृत्यू झाला होता, असा आरोप केला जातोय.
दरम्यान ममता बॅनर्जी या कार्यकर्त्याच्या कुटुंबीयांची भेट घेण्यासाठी त्या जात होत्या. त्यावेळी काही आंदोलकांनी त्यांच्या वाहनावर दगड, बूट आणि चिखल फेकण्यात आला. तसेच "चोर, चोर" अशा घोषणा देण्यात आल्या. ताब्यात असताना संशयास्पद परिस्थितीत मृत्यू झालेल्या 'टीएमसी' कार्यकर्ता बिरजू केओतच्या कुटुंबीयांची भेट घेण्यासाठी ममता बॅनर्जी जात होत्या.
टीएमसीच्या खासदार डोला सेन यांच्या म्हणण्यानुसार, आंदोलकांनी माजी मुख्यमंत्र्यांच्या गाडीला घेराव घातला. त्यांना "चोर, चोर" म्हणून हिणवलं. त्यांना घोषणा देण्यास सुरुवात केली. आंदोलकांनी गाडीवर मोठे दगड, बूट आणि चिखल फेकण्यास सुरुवात केल्याने परिस्थिती अत्यंत तणावपूर्ण बनली.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.