Kosovo PM: भरसंसदेत मोठा राडा; 'Shame On You' म्हणत पंतप्रधानांवर महिला खासदारानं फेकली अंडी, व्हिडिओ व्हायरल

MP Throws Eggs On PM : संसदीय अधिवेशनादरम्यान विरोधी पक्षाच्या खासदार टाइम काद्रिजा यांनी प्रभारी पंतप्रधान अल्बिन कुर्ती यांच्या दिशेने अंडी फेकली. त्यानंतर संसदेत मोठा गोंधळ झाला. सुरक्षा कर्मचाऱ्यांनी हस्तक्षेप केला आणि संसदेचे कामकाज स्थगित करण्यात आले.
MP Throws  Eggs On PM :
Kosovo Parliament Chaos: Opposition MP Throws Eggs at Acting PM Albin Kurtisaam tv
Published On
Summary
  • संसदेत विरोधी पक्षाच्या खासदाराने प्रभारी पंतप्रधान अल्बिन कुर्ती यांच्या दिशेने अंडी फेकली.

  • खासदार टाइम काद्रिजा यांच्या या कृतीनंतर संसदेत मोठा गोंधळ

  • घटनेनंतर संसदेचे कामकाज स्थगित करण्यात आले.

अधिवेशनाच्या सत्रादरम्यान विरोधी पक्षाच्या खासदार टाइम काद्रिजा यांनी प्रभारी (काळजीवाहू) पंतप्रधान अल्बिन कुर्टी यांच्या अंगावर अंडी फेकली. संसदेत झालेल्या मोठ्या राड्यानंतर शनिवारी कोसोवोच्या संसदेचे कामकाज स्थगित करण्यात आलं. ७ जून रोजी झालेल्या संसदीय निवडणुकीनंतर नवीन सरकारच्या स्थापनेबाबत विरोधी गटांशी 'वेतेवंदोस्जे' (Vetevendosje) पक्षाची चर्चा सुरू असतानाच हा गोंधळ उडाला. 'वेतेवंदोस्जे' हा पक्ष १२० पैकी ५३ जागा जिंकणारा सर्वात मोठा पक्ष बनलाय. परंतु स्वतंत्रपणे सरकार स्थापन करण्यासाठी आवश्यक असलेले बहुमत त्याला मिळाले नाही.

MP Throws  Eggs On PM :
देशात राजकीय हालचालींना वेग, १९ खासदारांचा मोदी सरकारला झटका, इनसाइड स्टोरी काय?

Shame On You पंतप्रधान

कोसोवोच्या भविष्यासाठीच्या आघाडी (AAK) या विरोधी पक्षाच्या खासदार काद्रिजाज यांनी, पहिल्या रांगेत बसलेल्या कुर्टी यांच्या दिशेने चालत गेल्या. त्यावेळी तुम्हाला लाज वाटली पाहिजे असं म्हणत पंतप्रधानांवर अंडी फेकून मारली. त्यावेळी सुरक्षा रक्षक आणि सहकारी खासदारांनी मध्यस्थी करत त्यांना दूर केलं. त्यावेळी महिला खासदार "तुम्हाला लाज वाटली पाहिजे!" असा आरडाओरड करू लागल्या.

MP Throws  Eggs On PM :
मुख्यमंत्र्यांना मोठा धक्का! CMच्या बैठकीला ३७ खासदारांची दांडी, काय आहे कारण?

हा गोंधळ उडाल्यानंतर सभागृहाच्या अध्यक्षांनी संसदीय कामकाज स्थगित केलं. महिला खासदाराने पंतप्रधान कुर्ती यांच्यावर अंडी फेकल्यानंतर सुरक्षा रक्षक आणि सभागृहातील मार्शलांनी पंतप्रधानांना घेराव घातला होतं. त्यानंतर काद्रिजाज यांनी या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केला.

दोन वर्षांपेक्षा कमी कालावधीत तीन निवडणुका

नवीन राष्ट्राध्यक्षांच्या निवडीबाबत समझोता घडवून आणण्यासाठी कायदेकर्त्यांकडून अतिरिक्त वेळ मागितल्यानंतर ही घटना घडली. संसदेच्या सभापतीपदासाठी त्यांनी उमेदवार सादर करणे अपेक्षित होते, परंतु राष्ट्राध्यक्षपदाबाबत एकमत न झाल्याचे कारण देत त्यांनी त्याऐवजी अधिक वेळ मागितला. कोसोवोमध्ये दोन वर्षांहून कमी कालावधीत तीन निवडणुका झाल्या आहेत. राजकीय मतभेदांमुळे संसदेचे कामकाज सुरळीत चालण्यात वारंवार अडथळे येत आहेत. विहित मुदतीत राष्ट्राध्यक्षांची निवड करण्यात लोकप्रतिनिधींना अपयश आल्यानंतर, ७ जून रोजी ही अलीकडील निवडणूक पार पडली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com