

शरद पवारांनी पीएम मोदींची भेट घेतली
सीजेपी आंदोलनावर शरद पवार आणि मोदींची चर्चा
संसदेतील पीएम मोदींच्या कार्यालायत झाली भेट
शरद पवार यांच्यासोबत सुप्रिया सुळे देखील होत्या उपस्थित
राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. या भेटीचे फोटो समोर आले असून ते व्हायरल होत आहेत. या भेटीमागचे कारण गुलदस्त्यात आहे. तिन्ही नेत्यांमध्ये बैठक झाली असून बराच वेळ चर्चा झाली असल्याची माहिती समोर आली आहे. संसदेतील पीएम मोदी यांच्या कार्यालयामध्ये ही भेट झाली.
सीजेपी आंदोलनाचा मुद्दा शरद पवार यांनी पीएम मोदी यांच्यासमोर मांडला. त्याचसोबत पेपर फुटीसंदर्भात काय उपाययोजना करता येईल यावर या नेत्यांमध्ये चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे. शरद पवार यांनी अचानक पीएम मोदी यांची भेट घेतल्यामुळे अनेकांनी भुवया उंचावल्या आहेत. या भेटीवर आता जोरदार चर्चा होऊ लागल्या आहेत.
सीजेपीच्या आंदोलनादरम्यान या दोन्ही नेत्यांची भेट खूपच महत्वाची मानली जात आहे. मंगळवारी शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांनी जंतर-मंतरवर जाऊन अभिजीत दिपके आणि आंदोलक विद्यार्थ्यांची भेट घेतली होती. या भेटीनंतर आज शरद पवार यांनी पीएम मोदींची भेट घेतल्यामुळे आता राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.