

उद्धव ठाकरे सीजेपीच्या आंदोलनावरून सरकारवर संतापले
मोदी सरकारवर उद्धव ठाकरेंनी केले गंभीर आरोप
सत्ताधाऱ्यांमध्ये कुणी पाकिस्तानी आहे का? असा खोचक टोला त्यांनी सरकारला लगावला
सीजेपी आंदोलनावर विरोधकांची भूमिका केली स्पष्ट
दिल्लीमध्ये सुरू असलेल्या सीजेपीच्या आंदोलनावरून राजकारण आता चांगलेच तापले आहे. सर्व विरोधी पक्षांनी या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. विरोधी पक्ष नेत्यांनी अभिजीत दिपकेंसह आंदोलकांची भेट घेतली. शिवसेना ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे यांनी मंगळवारी रात्री दिल्लीमध्ये गेले आणि त्यांनी आंदोलकांची भेट घेतली. आज त्यांनी पत्रकार परिषद घेत विद्यार्थ्यांचे आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न करणाऱ्या मोदी सरकारवर निशाणा साधला. यावेळी त्यांनी सत्ताधाऱ्यांमध्ये कुणी पाकिस्तानी आहे का?, असा खोचक टोला सरकारला केला.
उद्धव ठाकरे यांनी या आंदोलनावरून सरकारवर घणाघात केला. त्यांनी सांगितले की, 'शिवसेना पहिल्या दिवसापासूनच विद्यार्थ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे. काल राहुल गांधी यांनीही याविरोधात आंदोलन केले. या सरकारची विद्यार्थ्यांशी असणारी वागणूक अत्यंत वाईट आणि संतापजनक आहे. सत्ताधाऱ्यांच्या डोक्यात सत्ता आणि अहंकाराची हवा गेली आहे. पण जनताच त्यांना योग्य वेळी जमिनीवर आणल्याशिवाय राहणार नाही.'
'कुणीही आंदोलन करत असेल, तर त्यांच्याशी संवाद साधणे आणि चर्चा करणे हे सरकारचे प्राथमिक कर्तव्य आहे. जर आंदोलन चुकीच्या पद्धतीने सुरू असेल तर त्यांची समजूत काढणे हे देखील प्रशासनाचे काम असते. मात्र, केंद्र सरकारकडून विद्यार्थ्यांशी योग्य पद्धतीने संवादच झाला नाही. सरकारने वेळीच चर्चेची भूमिका घेतली असती तर आज ही परिस्थिती उद्भवलीच नसती.' असे मत उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केले.
सरकारला विद्यार्थ्यांशी बोलायला कमीपणा वाटतो अशी टीका करत उद्धव ठाकरे म्हणाले की, 'मी पहिल्या दिवसापासूनच सर्वांना पूर्ण पाठिंबा देत आलो आहे. मी काय करतोय हे सांगण्याची मला गरज वाटत नाही. तरुण हे या देशाचे भविष्य आणि भाग्य आहेत. पण जर तुम्ही या तरुणांचे भाग्यच चिरडून टाकणार असाल तर ते अत्यंत घातक आहे. त्यांची तुलना 'झुरळां'शी करणे हा नीचपणा असून हे अतिशय वाईट आहे. आज जर तुम्ही या देशाच्या आधारस्तंभालाच तुडवणार असाल तर ही तरुणाई तुम्हाला कधीही माफ करणार नाही. तरुणांशी संवाद साधायला तुम्हाला कसली लाज वाटतेय? लोकशाहीत चर्चेनेच प्रश्न सुटतात, हे सरकारने लक्षात ठेवावे.'
तसंच, 'कुणीही आंदोलन करत असेल, तर त्यांच्याशी संवाद साधणे हे सरकारचे काम आहे. जर आंदोलन चुकीच्या मार्गाने जात असेल, तर त्यांची समजूत काढणे ही देखील प्रशासनाचीच जबाबदारी असते. परंतु, केंद्र सरकारकडून विद्यार्थ्यांशी योग्य पद्धतीने चर्चाच झाली नाही. सरकारने जर वेळीच पुढाकार घेऊन संवाद साधला असता, तर आज ही परिस्थिती उद्भवलीच नसती.', असे मत देखील उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केले.
उद्धव ठाकरे पुढे म्हणाले की, 'देशाचे भवितव्य असलेल्या तरुणांवर सरकारकडून अत्यंत क्रूरपणे अत्याचार सुरू आहेत, असा थेट आरोप करत उद्धव ठाकरे यांनी सत्ताधाऱ्यांवर कडाडून हल्ला चढवला. देशात अराजकता पसरवण्याचा डाव स्वतः सत्ताधाऱ्यांचाच आहे. विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला बदनाम करण्यासाठी त्यात 'पाकिस्तानी हात' असल्याचा अजेंडा चालवला जात आहे. पण मूळ प्रश्न असा आहे की, सत्ताधाऱ्यांमध्येच कुणी पाकिस्तानी आहे का? आज या सत्ताधाऱ्यांपेक्षा इंग्रज बरे होते, असे म्हणायची वेळ देशातील जनतेवर आली आहे.', असा संतापही त्यांनी व्यक्त केला.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.