Ration Scheme Change: 
बिझनेस

Ration Scheme: मोफत रेशन योजनेबाबत मोदी सरकारचा मोठा निर्णय, योजनेत तीन मोठे बदल

Ration Scheme Change: मोदी सरकारने सार्वजनिक वितरण प्रणालीमध्ये तीन प्रमुख सुधारणांसह ‘सार्थक-पीडीएस’ योजना सुरू केली आहे. याचा परिणाम देशभरातील जवळपास ८० कोटी शिधावाटप लाभार्थ्यांवर होणार आहे.

Bharat Jadhav

  • मोदी सरकारने ‘सार्थक-पीडीएस’ योजना सुरू करण्याचा निर्णय घेतला.

  • सार्वजनिक वितरण प्रणालीमध्ये तीन मोठे बदल करण्यात आले आहेत.

  • लाभार्थी नोंदणीसाठी AI तंत्रज्ञानाचा वापर केला जाणार आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत एक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. या निर्णयाचा थेट परिणाम रेशन मिळवणाऱ्या ८० कोटी लोकांवर होणार आहे. सरकारने शिधावाटप प्रणाली (PDS - सार्वजनिक वितरण प्रणाली) संदर्भात एक मोठा निर्णय घेतलाय. "सार्थक-पीडीएस" योजना सुरू करण्यात आली आहे. या संपूर्ण योजनेवर अंदाजे ₹25,530 कोटी खर्च केले जाणार आहेत.

सार्वजनिक वितरण प्रणाली (PDS) योजनेत तीन मोठे बदल

मोदी सरकारनं घेतलेल्या निर्णयात या महत्त्वपूर्ण सार्वजनिक वितरण प्रणाली योजनेत तीन बदल करण्यात आले आहेत. यात राज्य सरकारला मदत, तंत्रज्ञानाचा वापर आणि या योजनेतील लाभार्थ्यांची नोंदणी ही कृत्रिम बुद्धिमतेचा वापर (AI) च्या मदतीने करणे या बदलांचा करण्यात आला आहे. केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी मंत्रिमंडळात झालेल्या निर्णयाची माहिती देताना सांगितलं की, "भारतीय अन्न महामंडळाच्या (FCI) मोठ्या गोदामांमधून प्रत्येक जिल्ह्यापर्यंत, तालुक्यांपर्यंत आणि अखेरीस शिधावाटप दुकानांपर्यंत धान्य पोहोचवताना राज्य सरकारांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत होता.

आता केंद्र सरकार राज्यांना आर्थिक मदत देईल." दुसरा बदल म्हणजे रेशन दुकान मालकांचे (डीलर्सचे) कमिशन वाढवले ​​जाणार आहे. केंद्रीय मंत्री म्हणाले, "रेशन डीलर्सचे कमिशन बऱ्याच काळापासून वाढवण्यात आले नव्हते. डीलर कमिशन वाढवण्याची सातत्याने मागणी होत होती. सरकारने ही मागणी मान्य करत कमिशन वाढवण्याचा निर्णय घेतला आहे."

तिसरा आणि अंतिम बदल म्हणजे संपूर्ण शिधावाटप प्रणाली अधिक आधुनिक आणि पारदर्शक बनवण्यात येणार आहे. यासाठी नवीन तंत्रज्ञानाचा वापर करणे. "सरकार या भव्य अर्थसंकल्पातून शिधावाटप वितरणाचा खर्च उचलणार आहे. दुकानदारांची कमाई वाढवेल आणि संपूर्ण प्रणालीचे डिजिटलीकरण व आधुनिकीकरण करणार आहे" .

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: उल्हासनगरात ऑनलाइन पेमेंटच्या बहाण्याने दुकानदाराला गंडा

MLC Election : महायुतीत पुन्हा रस्सीखेच! भाजप-शिंदेंची शिवसेना आमनेसामने; पाहा कुणाकडे किती मतांची संख्या

थकवा झटक्यात निघून जाईल! शरीराची एनर्जी वाढवण्यासाठी सकाळी प्या 'ही' नॅचरल टी

आदित्य ठाकरेंचा मुख्यमंत्र्यांना मध्यरात्री फोन; नंतर फडणवीसांनी बीएमसीमधील शिंदे गटाच्या प्लॅनला लावला ब्रेक

PMC Recruitment : पुणे महापालिकेचा मोठा निर्णय! नियुक्तीपत्रांवर असणार QR कोड, बनावट भरतीला बसणार आळा

SCROLL FOR NEXT