Manasvi Choudhary
चेहऱ्यावरचे पिंपल्स, काळे डाग आणि तेलकटपणा येणे ही अतिशय सामान्य समस्या आहे. या समस्येतून सुटका मिळवण्यासाठी अनेकजण बाजारात मिळणारे महागडे केमिकल फेसवॉश वापरतात.
मात्र यामुळे चेहऱ्यावरच्या समस्या आणखी वाढू शकतात. केमिकल फेसवॉशमुळे त्वचा अधिक कोरडी किंवा सेन्सेटिव्ह होते. जर तुम्हाला त्वचेला कोणताही त्रास न होता नैसर्गिक ग्लो हवा असेल, तर घरच्या घरी केमिकल फ्रि फेसवॉश बनवा.
केमिकल फ्रि फेसवॉश बनवण्यासाठी कडुलिंबाची पावडर, कोरफड जेल, गुलाबजल हे मिश्रण एकत्र करा.
एका वाटीमध्ये कडुलिंबाची पावडर घ्या. त्यात कोरफड जेल आणि गुलाबजल टाका. सर्व घटक व्यवस्थित एकत्र मिक्स करा.
नंतर तयार पेस्ट चेहऱ्यावर आणि मानेवर नीट लावा. १० ते १५ मिनिटे चेहऱ्यावर सुकू द्या.
१०-१५ मिनिटांनंतर हातावर थोडे पाणी घेऊन चेहऱ्यावर हलका फेस मसाज करा. त्यानंतर थंड पाण्याने चेहरा स्वच्छ धुवून घ्या.
चेहरा धुतल्यानंतर सुती कापडाने पुसून घ्या आणि त्वचेचा ओलावा टिकवून ठेवण्यासाठी हलके मॉइश्चरायझर लावा.
कडुलिंबामध्ये अँटी-बॅक्टेरियल आणि अँटी-फंगल गुणधर्म असतात, जे पिंपल्स कमी करतात
कोरफडमध्ये थंड गुणधर्म असते त्यामुळे त्वचेची जळजळ कमी होते.
गुलाबजल त्वचेचा पीएच तुलित ठेवून चेहऱ्याला नैसर्गिक टवटवीतपणा देते.
येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.