Amul Milk Price hike Saam tv
बिझनेस

Amul Milk Price Hike : सर्वसामान्यांना मोठा झटका; मदर डेअरीनंतर अमुलचे दूध महागले, जाणून घ्या नवे दर

Amul Milk Price hike News : सर्वसामान्यांना मोठा झटका बसलाय. मदर डेअरीनंतर अमुलचे दूध महागले आहे. दूधाचे नवीन दर जाणून घ्या.

Vishal Gangurde

सर्वसामान्यांना आणखी एक मोठा झटका बसला आहे. मदर डेअरीनंतर अमूलने दूधाची किंमत २ रुपयांनी वाढवली आहे. याआधी मंगळवारी रात्री मदर डेअरीने दूधाची किंमत २ रुपयांनी वाढवली. मदर डेअरीचे नवे दर आज बुधवारी ३० एप्रिलपासून लागू होणार आहे. दुसरीकडे अमूलनेही दूधाच्या किंमतीत वाढ केली आहे. अमूलच्या दूधाचे नव दर १ मे म्हणजे गुरुवारपासून देशभरात लागू होणार आहे.

मदर डेअरीने दिल्ली-एनसीआरमध्ये दूधाची किंमत ५४ रुपये प्रती लीटरवरून ५६ रुपये प्रती लीटर केली. तर फुल क्रीम दूधाची किंमत ६८ रुपये प्रती लीटरने वाढवून ६९ रुपये केली. तसेच स्निग्धांश काढून घेतलेल्या टोंड दूधाची किंमत ५६ रुपये प्रती लीटरहून ५७ रुपये प्रती लीटर करण्यात आली आहे. तर डबल टोंड दूधाची किंमत ४९ रुपये प्रती लीटरहून ५१ रुपये करण्यात आली आहे. गायीच्या दूधाची किंमत ५७ रुपये प्रती लीटर करण्यात आली आहे.

मदर डेअरीच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं की, 'खरेदी खर्चात वाढ झाल्याने दूधाच्या दरात वाढ करण्यात आली आहे. मागील काही महिन्यात किंमत ४-५ रुपयांनी प्रती लीटरपर्यंत वाढली होती. मदर डेअरीने आउटलेट, व्यापार आणि ई-कॉमर्स च्या माध्यमातून दिल्ली-एनसीआर बाजारात प्रतिदिन जवळपास ३५ लाख लीटर दूधाची विक्री केली जाते.

दूधाच्या दरात किती रुपयांनी झाली दरवाढ?

अमूल स्टँडर्ड दूध (500 मि.ली.)

जुनी किंमत: 30 रुपये - नवी किंमत: ३१ रुपये

अमूल म्हशीचं दूध 500 मि.ली.

जुनी किंमत: 36 रुपये - नवी किंमत: 37 रुपये

अमूल गोल्ड दूध (500 मि.ली.)

जुनी किंमत: 33 रुपये - नवी किंमत 34 रुपये

अमूल गोल्ड दूध (1 लीटर)

जुनी किंमत: 65 रुपये - नवी किंमत: 67 रुपये

अमूल स्लिम अँड ट्रिम दूध (500 मि.ली.)

जुनी किंमत: 24 रुपये - नवी किंमत: 2 रुपये

अमूल चहा स्पेशल दूध (500 मि.ली.)

जुनी किंमत: 31 रुपये - नवी किंमत: 32 रुपये

अमूल फ्रेश दूध (500 मि.ली.)

जुनी किंमत: 27 रुपये → नवी किंमत 28 रुपये

अमूल ताजा दूध (1 लीटर)

जुनी किंमत: 53 रुपये - नवी किंमत 55 रुपये

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ganpati Decoration Ideas : गणपतीसाठी डेकोरेशन व पूजेसाठी लागणाऱ्या वस्तू, जाणून घ्या पूर्ण यादी

Maharashtra Politics : ...म्हणूनच रोहित पवार आमदार झाला, अजित पवारांचा टोला

Wardha News : मनाला चटका लावणारी घटना; शेतावर फवारणीसाठी गेलेल्या तरूण शेतकऱ्याचा मृत्यू

Crime News: घरात चोर शिरल्याचा संशय, नवऱ्यानं उघडला बायकोच्या रुमचा दरवाजा, दृश्य पाहून धक्काच बसला

Maharashtra Live News Update: पीक विम्याचे निकष बदलण्यासाठी केंद्राकडे पाठपुरावा करणार - मंत्री दत्तात्रय भरणे

SCROLL FOR NEXT