Gold Price History : भारतात १९५९ साली १० ग्रॅम सोन्याची किंमत किती होती? बिल पाहून चकीत व्हाल

Gold Price History in Marathi : भारतात १९५९ साली १० ग्रॅम सोन्याची किंमत ११३ रुपये इतकी होती. त्या काळाचं बिल पाहून चकीत व्हाल.
Gold Price Today
Gold PriceSaam Tv
Published On

भारतात सोन्याची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. भारतात सोन्याची दागिने घालणारा मोठा वर्ग आहे. लग्न असो घरातील छोट्या मोठ्या समारंभात अनेकांचा सोन्याचे दागिने खरेदी करण्याचा कल असतो. याच सोन्याची किंमत गेल्या काही महिन्यांपासून वाढत असल्याचं पाहायला मिळत आहे. आता १ तोळे सोन्याची किंमत एक लाखापर्यंत पोहोचली आहे. दोन वर्षांपूर्वी म्हणजे २३ जानेवारी २०२३ रोजी सोन्याच्या एका तोळ्याची किंमत ५८८०० रुपये इतकी होती. तर १९५९ साली याच सोन्याच्या एका तोळ्याची किंमत जाणून चकीत व्हाल.

Gold Price Today
Cast Census : PM मोदींनी विरोधकांच्या हातातून महत्वाचा मुद्दा हिसकावला; जातनिहाय जनगणनेचा कुणाला फायदा अन् कुणाचं नुकसान?

सोन्याच्या किंमतीत दिवसेंदिवस बदल होत असल्याचं पाहायला मिळत आहे. १९५९ साली एक तोळे सोन्याची किंमत एकेकाळी फक्त ११३ रुपये इतकी होती. हो. ६६ वर्षांपूर्वी याच किंमतीला सोने मिळायचे. त्याचे अनेक पुरावे आहेत. असाच एक पुरावा सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. सोने खरेदीची एक जुनी पावती सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. १९५९ साली फार स्वस्त दरात सोने मिळत होतं. ६६ वर्षांपूर्वीच्या व्हायरल होणाऱ्या पावतीवर जुन्या तारखेचा उल्लेख आहे.

gold price
gold Saam tv
Gold Price Today
Pahalgam terror attack : PM नरेंद्र मोदी संकटकाळी बेपत्ता; पहलगाम हल्ल्यावरून काँग्रेसचा टोला; भाजपनेही दिलं सडेतोड प्रत्युत्तर

सध्याच्या घडीला ब्रँडेड चॉकलेट देखील महाग आहेत. व्हायरल होणाऱ्या फोटोंमधील पावतीत ३ मार्च १९५९ अशी तारीख आहे. ही पावती महाराष्ट्रातील वामन निंबाजी अष्टेकर यांच्या दुकानातील आहे. शिवलिंग आत्माराम असे सोने खरेदीदाराचे नाव आहे. शिवलिंग यांनी अष्टेकर दुकानातून सोने आणि चांदीचे दागिने खरेदी केल्याचं दिसत आहे. बिलात सोने आणि चांदीच्या दागिन्यांची एकूण किंमत ९०९ रुपये इतकी लिहिल्याचं दिसत आहे.

Gold Price Today
Pahalgam Terror Attack : कुछ तो बडा होने वाला है? भारत आक्रमक; अॅक्शन प्लॅन तयार, वाचा स्पेशल रिपोर्ट

व्हायरल होणाऱ्या बिलावर अनेकांनी प्रतिक्रियांचा वर्षाव केला आहे. अनेकांनी जुने दिवस चांगले होते, अशी प्रतिक्रिया काहींनी दिली आहे. काही दिवसांपूर्वी आयएफएस अधिकारी परवीन कासवान यांनी सोशल मीडियावर एका बिलाचा फोटो शेअर केला. त्यात एक किलो गव्हाची किंमत १.६ किलो रुपये आहे. त्या काळात गव्हाची विक्री १.६ रुपये किलोने व्हायची. गव्हाची किंमत सोन्यासारखी वाढली असती तर अनेक लोक उपासमारीने मृत पावले असते,अशा प्रतिक्रिया काही नेटकऱ्यांनी दिल्या.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com