Milk Price: 'या' कंपनीचं दूध महागलं, आजपासून नवे दर लागू; नेमकी किती रूपयांनी दरवाढ?

Milk Prices Soar Mother Dairy Increases Rates: मदर डेअरी कंपनीनं दूध दरात प्रतिलिटर २ रुपयांची वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. ३० एप्रिल २०२५ पासून हे नवे दर विविध राज्यांमध्ये लागू होणार आहेत.
Milk Price
MilkSaam tv
Published On

Mother Dairy Increases Milk Rates: सामान्यांच्या खिशाला कात्री बसणार आहे. कारण मदर डेअरी कंपनीचं दूध २ रूपयांनी महागलं आहे. मदर डेअरीच्या कंपनीनं दुधाच्या दरात प्रतिलिटर २ रूपयांनी वाढ करण्याचा निर्णय घेतला. कंपनीनं घेतलेला निर्णय ३० एप्रिल २०२५ पासून अंमलात आणण्यात येणार असून, आजपासून नवे दर लागू होणार आहे. दूध खरेदीचा खर्च वाढल्यानं हे पाऊल उचलावे लागत असल्याचं कंपनीचं म्हणणं आहे.

कंपनीकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, उन्हाळ्याच्या तीव्रतेमुळे दूध उत्पादनावर परिणाम झाला असून, त्यामुळे शेतकऱ्यांकडून दूध खरेदीचे दर वाढले आहेत. गेल्या काही महिन्यांमध्ये दूध खरेदीचा खर्च प्रतिलिटर ४ ते ५ रूपयांनी वाढल्यानं ही दरवाढ केल्याचं मदर डेअरीनं स्पष्ट केलं.

Milk Price
Pune News: महिलांच्या बाथरूममध्ये डोकावून पाहायचा; तरूणीचं लक्ष गेलं अन् रंगेहाथ पकडलं

दूध दरवाढीचा फटका दिल्ली, उत्तर प्रदेश, हरयाणा आणि उत्तराखंड या राज्यांना बसणार असून, ही दरवाढ बुधवार, ३० एप्रिल २०२५ पासून लागू होणार असल्याचं कपंनीनं स्पष्ट केलं आहे. यासंदर्भात कंपनीच्या प्रवक्त्याने सांगितलं की, 'शेतकऱ्यांना योग्य मोबदला मिळावा आणि ग्राहकांना चांगल्या दर्जाचं दूध मिळावं, यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. नव्या दरवाढीमुळे वाढलेल्या खर्चाचा केवळ अर्धा भाग ग्राहकांवर टाकण्यात आला आहे.'

Milk Price
Badlapur: एल्फिन्स्टनच्या पुनरावृत्तीची वाट पाहताय? मनसे नेत्याने दाखवलं बदलापूर रेल्वे स्टेशनचे भयाण वास्तव | VIDEO

दुधात करण्यात आलेल्या दरवाढीचा फटका दिल्लीत आणि शेजारच्या राज्यांतील लाखो ग्राहकांना बसणार आहे. यामुळे सामान्य ग्राहकांच्या खिशावर पुन्हा एकदा महागाईचा तडाखा बसण्याची शक्यता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com