Success Story Saam Tv
बिझनेस

Success Story: ब्युटी विथ ब्रेन! १०वीत टॉपर, , UPSC परीक्षेत पहिल्याच प्रयत्नात ५वी रँक; IAS सृष्टी देशमुख यांचा प्रवास

Success Story of IAS Srushti Deshmukh: आयएएस सृष्टी देशमुख या नेहमी चर्चेत असतात. सृष्टी देशमुख यांनी २०१८ मध्ये पहिल्याच प्रयत्नात यूपीएससी परीक्षा क्रॅक केली आहे.

Siddhi Hande

आयएएस सृष्टी देशमुख (IAS Srushti Deshmukh) हे नाव तर सर्वांना माहितच असेल.आपल्या कामगिरीमुळे सृष्टी देशमुख नेहमीच चर्चेत असतात. याशिवाय त्यांनी विद्यार्थ्यांसाठी पुस्तकदेखील लिहलं आहे. त्यांचे विचार हे विद्यार्थ्यांसाठी नेहमीच प्रेरणादायी असतात. आयएएस सृष्टी देशमुख यांचे लक्ष्य आयएएस अधिकारी होण्याचे होते. त्यांनी यूपीएससी परीक्षेचा अभ्यास केला अन् त्यांना यशदेखील मिळाले.

आयएएस सृष्टी देशमुख या मूळच्या भोपाळच्या. त्यांचा जन्म २८ मार्च १९९६ रोजी झाला. त्यांना अभ्यासात खूप हुशार होत्या. त्यांनी २०१८ मध्ये यूपीएससी परीक्षा क्रॅक केली.

सृष्टी यांचा लहानपणापासूनचा प्रवास

सृष्टी जयंत देशमुख (Srushti Deshmukh) यांचे वडील एका प्रायव्हेट कंपनीत इंजिनियर म्हणून कार्यरत होते. तर आई शाळेत शिक्षिका होत्या. सृष्टी यांनी भोपाळच्या कॉर्मेल कॉन्वेंट स्कूलमधून शिक्षण घेतले. त्यांना दहावीत 10 CGPA आणि १२वीत ९३ टक्के गुण मिळाले होते. त्यांनी इंजिनियरिंग पदवी प्राप्त केली आहे. शिक्षण पूर्ण करत असतानाच सृष्टी यांनी स्पर्धा परीक्षेची तयारी सुरु केली.

पहिल्याच प्रयत्नात UPSC क्रॅक

सृष्टी देशमुख यांना पहिल्याच प्रयत्नात यूपीएससी (UPSC) परीक्षा क्रॅक करायची होती. यूपीएससीचा पहिलाच प्रयत्न हा त्यांचा शेवटचा अटेम्ट असेल असं त्यांनी ठरवले होते. त्यांनी पहिल्याच प्रयत्नात यश मिळवले. २०२८ मध्ये त्यांनी ५वी रँक प्राप्त केली. सृष्टी यांच्या मार्कशीटचा फोटोदेखील सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.

सृष्टी देशमुख यांचे पती

सृष्टी देशमुख यांचे पतीदेखील आयएएस ऑफिसर आहेत. त्यांनी IAS डॉ.नागार्जुन बी गौडा (IAS Nagarjun Gowda)यांच्यासोबत लग्नगाठ बांधली. त्यांचे भेट आयएएसत्या ट्रेनिंगदरम्यान LBSNAA अकॅडमीत झाली होती. त्यांचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असतात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Anant Chaturdashi 2025 live updates : लालबागच्या राजाच्या मुख्यप्रवेशद्वारासमोर भीषण अपघात,२ वर्षीय मुलीचा मृत्यू तर ११ वर्षीय मुलगा गंभीर जखमी

Vashi Toll Accident : वाशी टोल नाक्यावर भंयकर अपघात, नवरा-बायकोचा जागीच मृत्यू, नेमकं काय घडलं?

Maharashtra Live News Update: अमरावतीमध्ये भीषण अपघात झाला, टोमॅटोने भरलेला पिकअप उलटला

Mumbai Bomb Threat: मुंबईला बॉम्बने उडवून देण्याची धमकी देणाऱ्याला अटक, उत्तर प्रदेश कनेक्शन उघड

Malpua Recipe: सण-उत्सवासाठी घरच्या घरी मऊसर आणि रसाळ मालपुवा कसा बनवायचा? वाचा स्टेप बाय स्टेप रेसिपी

SCROLL FOR NEXT