
यूपीएससी (UPSC) ही देशातील सर्वात प्रतिष्ठित अन् अवघड परीक्षा आहे. यूपीएससी परीक्षा देऊन आयएएस अधिकारी होण्याचे अनेकांचे स्वप्न असते. हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी दिवसरात्र मेहनत करावी लागते. पकंतु अनेकदा पहिल्या प्रयत्नात यश मिळत नाही. असं असले तरीही जी व्यक्ती सतत प्रयत्न करते ती नक्कीच यशस्वी होते. असंच काहीसं स्मिता सभरवाल यांच्यासोबत झालं. त्यांनी यूपीएससी परीक्षेत तर यश मिळवलं परंतु त्यांच्या नावावर अनेक रेकॉर्डदेखील आहेत.
स्मिता सभरवाल यांची बदली
स्मिता सभरवाल (IAS Smita Sabharwal) या नुकत्याच चर्चेत आल्या आहेत.स्मिता सभरवाल (IAS Smita Sabharwal) यांची नुकतीच बदली करण्यात आली आहे. स्मिता यांनी सोशल मीडियावर हैदराबाद सेंट्रल युनिव्हर्सिटीजवळील ४०० एकरवरील झाडे तोडल्याचा एक घिबली स्टाईल फोटो सोशल मीडियावर शेअर केला होता. या फोटोसंदर्भात पोलिसांकडून चौकशी सुरु करण्यात आली आहे. स्मिता यांनी चौकशीसाठी पोलिस स्टेशनमध्ये हजर राहावे लागणार आहे.
स्मिता यांचे बालपण, शिक्षण
स्मिता या सध्या तेलंगणातमध्ये (Telangana) कार्यरत आहेत.स्मिता यांचे वडील प्रणब दास हे आर्मी ऑफिसर होते. स्मिता यांचे बालपण हैदराबादमध्ये गेले. त्यांचे सर्व शिक्षणदेखील हैदराबादमधूनच झाले.स्मिता या २००० बॅचच्या आयएएस ऑफिसर आहेत. त्यांनी २३ व्या वर्षीच यूपीएससी परीक्षा क्रॅक केली.स्मिता यांनी चौथी रँक प्राप्त केली होती. त्यांची मार्कशीटदेखील सोशल मीडियावर व्हायरल झाली होती.
स्मिता यांनाही अपयशाचा सामना करावा लागला.एवढ्या हुशार असतानाही पहिल्या प्रयत्नात त्यांनी प्रिलियम्सदेखील क्लिअर करता आली नाही. परंतु त्यांनी हार मानली नाही. त्यांनी पुन्हा यूपीएससी परीक्षेचा अभ्यास सुरु केला. दुसऱ्याच प्रयत्नात त्यांना यश मिळाले.फक्त आयएएस ऑफिसर नाही तर संपूर्ण देशात त्यांनी चौथी रँक प्राप्त केली.
२३ व्या वर्षी यूपीएससी क्रॅक
स्मिता सभरवाल या सर्वात कमी वयात यूपीएससी (UPSC) क्रॅक करणाऱ्या अधिकाऱ्यांपैकी एक आहेत. त्या नेहमी सोशल मीडियावर सक्रिय असतात. त्या नेहमीच तरुणांना प्रेरणा देत असतात. त्यांचा हा प्रवास स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या प्रत्येकासाठी प्रेरणादायी आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.