Prateik babbar Wedding: स्मिता पाटीलचा मुलगा दुसऱ्यांदा चढला बोहल्यावर; पण लग्नाला बब्बर कुटुंबाला निमंत्रणच नाही, कारण काय?

Pratik babbar Wedding: राज बब्बर आणि दिवंगत स्मिता पाटील यांचा मुलगा प्रतीकने त्याची प्रेयसी प्रिया बॅनर्जीशी लग्न केले आहे. दोघांच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहेत.
Prateik babbar Wedding
Prateik babbar WeddingSaam Tv
Published On

Prateik babbar Wedding: प्रसिद्ध दिवंगत अभिनेत्री स्मिता पाटील आणि अभिनेता राज बब्बर यांचा मुलगा अभिनेता प्रतिक बब्बर दुसऱ्यांदा विवाह बंधनात अडकला आहे. अभिनेता प्रतीक बब्बरने अभिनेत्री प्रिया बॅनर्जीसोबत व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी लग्न केले. प्रतीक आणि प्रियाचे लग्न प्रतीकची दिवंगत आई स्मिता पाटील यांच्या मुंबईतील वांद्रे येथे घरी झाले. दोघांनीही घरगुती पारंपारिक पद्धतीने लग्न केले आणि नंतर सोशल मीडियावर लग्नाचे सुंदर फोटो पोस्ट केले. या फोटोंमध्ये दोघेही खूप आनंदी दिसत आहेत.तर, एका फोटोमध्ये प्रतीक भावुक झालेला दिसत आहे.

फोटो पोस्ट केले आणि लिहिले...

फोटोत प्रतीक आणि प्रिया एकमेकांना किस करताना दिसत आहेत. दुसऱ्या फोटोमध्ये, प्रतीक प्रिया गळ्यात मंगळसूत्र बांधताना दिसत आहे. तिसऱ्या चित्रात, प्रतीक भावुक होताना दिसत आहे. दरम्यान, प्रिया त्याची काळजी घेत आहे. हे सुंदर फोटो शेअर करत प्रतीक आणि प्रियाने, 'मी प्रत्येक जन्मात तुझ्याशी लग्न करेन #priyaKAprateik.' असे कॅप्शन लिहीले आहे.

Prateik babbar Wedding
Indias got latent controversy: समय-रणवीरच्या अडचणीत वाढ; महाराष्ट्र पोलीस नंतर आता आसाम पोलिसांसमोर ही हजेरी

चार वर्षांपासून एकमेकांना डेट करत होते

प्रतीक आणि प्रिया गेल्या पाच वर्षांपासून एकमेकांना डेट करत आहेत. तथापि, प्रतीक आणि प्रिया यांनी दोन वर्षांपूर्वी व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी इंस्टाग्रामवर त्यांचे नात्याबद्दल अधिकृतपणे घोषणा केली. दोघांनीही या वर्षी लग्न केले. प्रतीक आणि प्रिया त्यांच्या लग्नासाठी डिझायनर तरुण ताहिलियानी यांनी डिझाइन केलेल्या आयव्हरी रंगाच्या पोशाख परिधान केला होता.

Prateik babbar Wedding
Vicky Kaushal: विकी कौशल महाकुंभ मेळ्यात सहभागी; त्रिवेणी संगमावर केलं पवित्र अमृतस्नान, VIDEO व्हायरल

दरम्यान, प्रतीकने बब्बर कुटुंबाला त्याच्या लग्नाचे आमंत्रण दिले नव्हते. प्रतीक आणि प्रियाचे लग्न बब्बर कुटुंबाशिवायच झाले. प्रतीकचे वडील आणि ज्येष्ठ अभिनेते राज बब्बर यांनाही प्रतीकने आमंत्रण दिले नव्हते. प्रतीकचे सावत्र भावंडे आर्य बब्बर आणि जुही बब्बर यांना लग्नासाठी आमंत्रित करण्यात आले नव्हते. गेल्या सहा महिन्यांपासून प्रतीक आणि त्याच्या कुटुंबासोबतच नातं चांगलं नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com