Indias got latent controversy: समय-रणवीरच्या अडचणीत वाढ; महाराष्ट्र पोलीस नंतर आता आसाम पोलिसांसमोर ही हजेरी

Indias got latent controversy: 'इंडियाज गॉट लेटेंट'मधील टिप्पण्यांमुळे वादात अडकलेले रैना, रणवीर इलाहाबादिया, अपूर्व मखीजा आणि आशिष चंचलानी यांना महाराष्ट्र सायबर सेलने जबाब नोंदवण्यासाठी समन्स बजावले आहे.
Indias got latent controversy
Indias got latent controversySaam tv
Published On

Indias got latent controversy: 'इंडियाज गॉट लेटेंट'मध्ये केलेल्या टिप्पण्यांमुळे समय रैना, रणबीर इलाहाबादिया, अपूर्व मखीजा, आशिष चंचलानी हे इन्फ्लुएन्सर अडचणीत सापडले आहेत. महाराष्ट्र सायबर सेलने या चौघांना समन्स पाठवून १८ फेब्रुवारी रोजी त्यांचे जबाब नोंदवण्यासाठी बोलावले आहे. तसेच आता आसाम पोलिसांनीही या चौघांना त्यांचा जबाब मांडण्यासाठी बोलावले आहे.

या इन्फ्लुएन्सर विरोधात मुंबई,दिल्ली तसेच गुवाहाटीमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुंबईसह, या लोकांना १८ फेब्रुवारी रोजी गुवाहाटी पोलिस मुख्यालयातही बोलावण्यात आले आहे. शुक्रवारी रणवीरबद्दल एक बातमी अशीही आली की गुरुवारी पोलिस त्याच्या वर्सोवा येथील घरी पोहोचले असता त्याचे घर बंद होते. यापूर्वी,त्याच्या सुरक्षिततेचा हवाला देत, रणवीरने म्हटले होते की त्याचे जबाब त्याच्या घरी नोंदवले जावे, परंतु पोलिसांनी त्याची मागणी फेटाळून लावली.

Indias got latent controversy
Vicky Kaushal: विकी कौशल महाकुंभ मेळ्यात सहभागी; त्रिवेणी संगमावर केलं पवित्र अमृतस्नान, VIDEO व्हायरल

कॉमेडियन देवेश दीक्षितचा जबाब नोंदवला

पोलिसांनी सर्वांना १८ फेब्रुवारी रोजी हजर राहण्यास सांगितले आहे. शुक्रवारी महाराष्ट्र सायबर सेलने कॉमेडियन देवेश दीक्षित याचा जबाब नोंदवला. तो 'इंडियाज गॉट लेटेंट'च्या एका भागात जज म्हणून गेला होता. याशिवाय, 'इंडियाज गॉट लेटेंट' या शोच्या सर्व भागांचे व्हिडीओ एडिटर प्रथम सागर याचेही जबाब खार पोलिसांनी नोंदवले आहेत. आतापर्यंत ८ जणांचे जबाब नोंदवण्यात आले आहेत.

Indias got latent controversy
Prajakta Mali: चिकी चिकी बुबूम बुममध्ये प्राजक्ताचा हटके अंदाज; पहिल्यांदाच साकारणार विनोदी भूमिका

याशिवाय, महाराष्ट्राच्या संस्कृती विभागाला 'इंडियाज गॉट लेटेंट' आणि अशा इतर शोविरुद्ध अश्लीलतेच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. या शोमध्ये, योग्य परवानगीशिवाय प्रेक्षकांसाठी तिकिटांद्वारे कार्यक्रम आयोजित केले जात आहेत. मंत्री आशिष शेलार यांच्या अध्यक्षतेखाली सांस्कृतिक विभागात एक बैठक झाली. बैठकीनंतर मंत्री आशिष शेलार यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.

समय रैनाने वेळ मागितला होता.

आता हे पाहायचे आहे की समय रैना १८ फेब्रुवारी रोजी आपला जबाब नोंदवण्यासाठी हजर राहील की नाही, कारण अलीकडेच त्याने १७ मार्चपर्यंत पोलिसांकडे वेळ मागितला होता. तो म्हणाला की तो सध्या अमेरिकेत आहे. त्याने असेही सांगितले की १६ आणि २० फेब्रुवारी रोजी अमेरिकेत त्याचा एक कार्यक्रम आहे. दरम्यान, पोलिसांनी त्याला वेळ दिला नाही आणि १७-१८ फेब्रुवारी रोजी मुंबईत येऊन त्याचा जबाब नोंदवून अमेरिकेत परत जाण्यास सांगितले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com