Success Story: बाईपण भारी देवा! २ मुलींच्या आईने ४० व्या वर्षी क्रॅक केली UPSC; निसा उन्नीराजन यांचा प्रवास

Success Story of UPSC Topper Nisa Unnirajan: निसा यांनी यूपीएससी परीक्षेत यश मिळवलं आहे. त्यांनी वयाच्या ४० व्या वर्षी स्पर्धा परीक्षा क्रॅक केली आहे. त्यांचा हा प्रवास खूपच प्रेरणादायी आहे.
Success Story
Success StorySaam Tv
Published On

यूपीएससी ही देशातील अवघड परीक्षा आहे. यूपीएससी परीक्षा पास करुन आयएएस आणि आयपीएस ऑफिसर होऊ शकतं. आपण कोणत्याही वयात यशस्वी होऊ शकतो. शिक्षणासाठी कोणतेही वय नसते. असंच काहीसं निसा उन्नीराजन यांनी केलं. त्यांनी ४० व्या वर्षी यूपीएससी परीक्षा क्रॅक केली. कितीही संकंटे आली तरीही त्यांनी हार मानली नाही. त्यांनी आपले स्वप्न पूर्ण करण्यासाठी मेहनत घेतली. २०२४ मध्ये सातव्या प्रयत्नात त्यांना १०००वी रँक प्राप्त केली.

Success Story
Success Story: नासाची नोकरी सोडली, पतीसोबत UPSC ची तयारी; पाचव्या प्रयत्नात IPS, वाचा अनुकृति शर्मा यांचा प्रवास

३५ व्या वर्षी सुरु केला अभ्यास

यूपीएससी (UPSC) परीक्षेत १००० रँक प्राप्त केली. त्यांनी वयाच्या ३५ व्या वर्षी यूपीएससी परीक्षेची तयारी केली. या वयात काहीही करायची इच्छा नसते. त्या वयात त्यांनी यूपीएससीसारखी अवघड परीक्षा देण्याचा निर्णय घेतला. त्यांनी आपल्या मुली आणि नवऱ्याच्या सपोर्टमुळे एवढं मोठं यश मिळवलं आहे. त्यांचे आईवडिल रिटायर्ड पोलिस ऑफिसर आहेत.

अपयशातून मिळाली प्रेरणा

निसा यांना अनेकदा अपयश मिळाले. तरीही त्यांना हार मानली नाही. प्रत्येक अपयशाने त्यांना काही न काही शिकवले, असं निसा यांनी सांगितलं. प्रत्येक वेळी त्यांना काही न काही प्रेरणा मिळाली. निसा यांनी दिव्यांग कॅटेगरीमधून हे यश मिळवलं आहे.

निसा यांनी तिरुवनंगपुरम येथील एका कोचिंग सेंटकमधून स्पर्धा परीक्षेची तयारी केली. याचसोहत त्यांना कोट्टायमचे उप-जिल्हाधिकारी रंजीत यांच्याकडून प्रेरणा मिळाली. त्यांनी खूप मेहनत केली त्याचे त्यांना यश मिळाले.

Success Story
Success Story: आईचं छत्र हरवलं, वडिलांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी UPSC क्रॅक; आधी CA झाली अन् आता होणार IAS

निसा यांना या प्रवासात अनेक अडचणी आल्या परंतु त्यांनी कधीच हार मानली नाही. स्वतः ला सिद्ध करण्यासाठी दिवसरात्र मेहनत केली. त्यामुळे त्यांना यश मिळाले. आता निसा आयएएस होण्यासाठी तयार आहेत. त्यांचा हा प्रवास प्रत्येकासाठी प्रेरणादायी ठरेल.

Success Story
Success Story: इंजिनियरिंग केलं, एकदा नव्हे तर दोनदा UPSC क्रॅक; पुण्याच्या अर्चित डोंगरेची यशोगाथा

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com