बिझनेस

Maruti Suzuki cars : महागाईचा ग्राहकांना मोठा धक्का, मध्यमवर्गीयांना परवडणारी कार महागली; मारुती सुझुकीच्या दरात भरघोस वाढ

Maruti Suzuki price hike : महागाईने ग्राहकांना मोठा धक्का दिला आहे. मध्यमवर्गीयांना परवडणारी कार महागली आहे. मारुती सुझुकीच्या दरात भरघोस वाढ झाली आहे. वाचा मारुती सुझुकीच्या कारचे नवे दर

Vishal Gangurde

Maruti Suzuki Cars Price Hike : मारुती सुझुकीची नवी कार खरेदी करणाऱ्यांसाठी दु:खद बातमी हाती आली आहे. मारुती सुझुकी कारचे दर १ फेब्रुवारीपासून महागणार आहेत. कंपनीला लागणाऱ्या कच्च्या मालाची दरवाढ आणि दुसरे खर्च वाढल्याने कारच्या किंमतीत वाढ करण्यात आली आहे. या किंमतीमध्ये ५००० रुपये ते ३२५०० रुपयांपर्यंत वाढ झाली आहे. प्रत्येक कारच्या किंमतीत वेगवेगळी वाढ झाली आहे.

मारुती सुझुकी कंपनीला लागणारा कच्चा माल महागला आहे. तसेच कंपनीच्या इतर खर्चातही मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे कारच्या किंमतीत वाढ केल्याची माहिती कंपनीने दिली आहे. आम्ही ग्राहकांवर कमीत कमी ताण येऊ देण्याचा प्रयत्न करत आहे. मारुती सुझुकीची सर्वात स्वस्त कार ही ऑल्टो K-10 आहे. या कारची एक्स शोरुमची किंमत ३.९९ लाख रुपये आहे. सर्वात महागडी कार ही इनविक्टो आहे. या कारची शोरुम किंमत २८.९२ लाख रुपयापर्यंत आहे.

मारुती सुझुकीची सर्वाधिक विक्री होणारी वॅगन-आर ही कार १५००० रुपयांनी महागणार आहे. मारुती सुझुकीची नवी डिझायर कारची किंमत १०००० रुपयांनी वाढण्याची शक्यता आहे.

मारुती सुझुकीची सर्वाधिक विकली जाणारी एसयूव्ही ब्रेजाची किंमत २०,००० रुपयांनी वाढण्याची शक्यता आहे. मारुती सुझुकीची सेलेरिया या कारची किंमत ३२००० रुपयांनी वाढ होण्याची शक्यता आहे.

मारुती सुझुकीची बजेट प्रीमियम हॅचबॅक स्विफ्ट कारची किंमत ५००० रुपयांनी वाढण्याची शक्यता आहे. हॅचबॅक बलेनोची किंमत ९००० रुपयांनी वाढण्याची शक्यता आहे. मारुती सुझुकीची फ्रॉन्क्सची किंमत पुढील महिन्यात ५,५०० रुपयांनी वाढण्याची शक्यता आहे. तसेच मारुती सुझुकीची एसयूव्ही ग्रँड विटाराची किंमत पुढील महिन्यात २५००० रुपयांनी वाढण्याची शक्यता आहे.

मारुती सुझुकीची एमपीव्ही एनविक्टोची किंमत ३०००० रुपयांनी वाढण्याची शक्यता आहे. हॅचबॅक ऑल्टो K-10 ची किंमत १९५०० रुपयांनी वाढण्याची शक्यता आहे. तर S-presso ची किंमत ५००० रुपयांनी वाढण्याची शक्यता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

नो पार्किंग क्षेत्रात कॅबिनेट मंत्र्याची कार; पोलिसांनी क्रेनने उचलून नेली, व्हिडिओ व्हायरल

HSRP नंबरप्लेटसंदर्भात महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, वाहनधारकांना दिलासा; 'या' तारखेपूर्वी करा काम

Nandurbar : चांदसैली घाटात दरड कोसळली; थोडक्यात दुर्घटना टळली

Maharashtra Live News Update: यवतमाळ जिल्ह्यातील तीनशे घरात शिरलं पाणी

Heart blockage symptoms:हार्ट ब्लॉकेज झाल्यावर शरीरात दिसतात ६ मोठे बदल; तुम्हालाही त्रास होत असेल तर सावध व्हा

SCROLL FOR NEXT