Bla Bla Car App: ब्ला ब्ला कार अ‍ॅपवर पुणे आरटीओची नजर; अवैध प्रवासी वाहतुकीवर बसणार चाप

Bla Bla Car App On Radar : ब्ला ब्ला कार ॲप सारख्या इतर तत्सम ॲपद्वारे अवैध प्रवासी वाहतुकीची तपासणी करण्याचे आदेश पुणे प्रादेशिक परिवहन विभागाकडून देण्यात आले आहेत.
Bla Bla Car App
Bla Bla Car App On RadarSaam Tv
Published On

मुंबई-पुणे प्रवासाठी तुम्ही ब्ला ब्ला ॲपचा वापरत करत आहात का? हो, तर ही बातमी तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. या अॅपद्वारे अवैध प्रवास वाहतूक केली जात असून हे अॅप आणि कार चालक आता पुणे प्रादेशिक परिवहन विभागाच्या रडारवर आहेत. पुणे प्रादेशिक परिवहन विभागाकडून त्यांच्यावर कारवाई केली जाणार आहे.

एकट्यासाठी चारचाकी गाडी काढून मुंबई पुण्याला प्रवास करणाऱ्या प्रवाशांना कार पुलिंग करून पैसे वाचवण्याची सुविधा ब्ला ब्ला ॲपेने उपलब्ध करून दिली होती. मुंबई, पुणे आणि नाशिक या शहरांमध्ये रोज प्रवास करणाऱ्या अनेक प्रवाशांना ही मोठी सोय झाली होती. त्यातच पैशांची, इंधनाची बचत अशा कारणांमुळे अगदी कमी वेळेत हे ॲप प्रचंड लोकप्रिय झालं आणि त्याला प्रतिसाद ही मोठ्या प्रमाणावर मिळाला पण आता आर टी ओ ने म्हणजेच परिवहन विभागाने एक नवा आदेश जाहीर केला आहे.

ब्ला ब्ला कारचे पिकअप पॅाईंट शोधून त्यावर कारवाई करण्यात येणार असल्याचे आदेशात म्हटले आहे. त्यासाठी अगदी खोटे प्रवाशी म्हणून नोंदी करून प्रवास करा आणि त्यानंतर कारवाई करा अश्या सूचना सुद्धा देण्यात आल्या आहेत. कारवाई करण्यासाठी रस्ता सुरक्षा पथकाला पुण्यातील नवले पूल, चांदणी चौक, स्वारगेट, पुणे स्टेशन यासारख्या आणखी काही ठिकाणी पथके तैनात करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या ॲप सारख्या इतर ॲपद्वारे बुकिंग केलेल्या खाजगी वाहनांची तपासणी सुद्धा केली जाणार आहे. या वाहनांवर आता ई चलनद्वारे ही कारवाई होणार असल्याचे आदेशात नमूद केले आहे.

याबाबत माहिती देताना असिस्टंट रिजिनल ट्रान्सपोर्ट ऑफिसर विनायक साखरे म्हणाले की, ब्ला ब्ला अॅप आणि इतर अशा ॲपद्वारे प्रवासी वाहतूक केली जाते. ही वाहतूक अवैध आहे. वाहतूक पोलिसांना या ॲपचे पिकअप पाईंट शोधून त्यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहे. ब्ला ब्ला ॲप तसेच तत्सम ॲपविरोधात तक्रार प्राप्त झाली होती. त्यानुसार कारवाई काही जण खासगी कारचा उपयोग प्रवासी वाहतुकीसाठी केला जातो.

Bla Bla Car App
Pune Crime : ऑफिसचा वाद, पार्किंगमध्ये तरुणीचा घात; चॉपरच्या हल्ल्यात IT कंपनीतील महिला कर्मचाऱ्याचा मृत्यू

हे मोटार वाहन कायद्यानुसार अवैध प्रवाशी वाहतूक असल्याने त्यावर कारवाई करण्यात यावी, याबाबत आपण आदेश काढल्याची माहिती असिस्टंट रिजिनल ट्रान्सपोर्ट ऑफिसर साखरे यांनी दिली.

असा चालू आहे अवैध प्रकार

या ॲपच्या माध्यमातून बुकिंग केली जाते. त्या बुकिंगच्या आधारे एक-एका प्रवाशांकडून पैसे जमा केले जातात आणि वाहतूक केली जाते. ही एकप्रकार टप्पा वाहतूकही होते आणि त्यांच्याकडे वाहतुकीसाठी परवाना नसल्याने ही अवैध वाहतूक आहे. जर अशा कारचा अपघात झाला तर त्या कार चालकाकडे बॅच नसतो.

Bla Bla Car App
Pune News : रिंग रोडसाठी ९० टक्के भूसंपादन, भूमिपूजनाचा मार्ग मोकळा, ३ दिवसांत शिक्कामोर्तब होणार

शिवाय त्यांच्याकडे प्रवाशी वाहतुकीचा परवाना देखील नसतो. त्यामुळे अपघात विमा क्लेम होत नाही. त्यामुळे अशा अवैध प्रवाशी वाहतुकीला आळा घालण्यासाठी कारवाई करण्यासाठी आदेश देण्यात आलेत. प्रवासी बुकिंग ही ऑनलाइन केली जाते, त्यामुळे पोलिसांनाच प्रवाशी होत या ब्ला ब्ला ॲपच्या अवैध प्रवासी वाहतुकाचा पदार्फाश करण्याचे निर्देश देण्यात आलेत. या ॲपचे पिकअप पाईंट शोधून कार चालकांवर कारवाई केली जाणार आहे. पोलीस कारमधील प्रवाशांची नोंद देखील या कारवाई दरम्यान करणार आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com