Maruti ALto K10 and Maruti S-Presso  Saam Tv
बिझनेस

25KM मायलेज देणाऱ्या या दोन गाड्या झाल्या स्वस्त, कंपनीने इतक्या रुपयांनी कमी केली किंमत; जाणून घ्या संपूर्ण माहिती

Maruti ALto K10 and Maruti S-Presso : मारुती सुझुकीने आपल्या कारच्या किमती कमी केल्या आहेत. कंपनीने Alto K10 आणि S-Presso पेट्रोलच्या किमती कमी केल्या आहेत.

Satish Kengar

जर तुम्ही सध्या मारुती सुझुकीची नवीन कार खरेदी करण्याचा विचार करत असाल तर आता तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. मारुती सुझुकीने आपल्या कारच्या किमती कमी केल्या आहेत. कंपनीने Alto K10 आणि S-Presso पेट्रोलच्या किमती कमी केल्या आहेत.

सोमवारपासून (2 सप्टेंबर), S-Presso LXI ची किंमत 2,000 रुपयांनी आणि Alto10 VXI ची किंमत 6,500 रुपयांनी कमी झाली आहे. मारुतीने या दोन्ही कार्सच्या किमती का कमी केल्या आहेत, याबद्दल अधिक माहिती जाणून घेऊ...

मारुती सुझुकीला गेल्या महिन्यात (ऑगस्ट 2024) विक्रीत मोठी घसरण झाली. गेल्या महिन्यात (ऑगस्ट 2024) मारुतीने 181,782 युनिट्सची विक्री केली होती. तर मागील वर्षी याच कालावधीत मारुतीने 189,082 युनिट्सची विक्री केली होती. त्यामुळे यावेळी मारुतीच्या विक्रीत 3.9 टक्क्यांची घट झाली आहे.

Maruti ALto K10 ची किंमत आणि फीचर्स

मारुती सुझुकी अल्टो K10 ही लहान कुटुंबासाठी बेस्ट कार आहे. या कारमध्ये पॉवरफुल 1.0L पेट्रोल इंजिन आहे. ही कार CNG मध्ये देखील उपलब्ध आहे आणि 33.85 किमी/किलो मायलेज देते, असं कंपनीचं म्हणणं आहे. ही एक फे सतार कार आहे. सुरक्षिततेसाठी कारमध्ये अँटी-लॉक ब्रेकिंग सिस्टमसह EBD आणि एअरबॅग्ज आहेत. ALto K10C VXI CNG ची एक्स-शो रूम किंमत दिल्लीमध्ये 5.96 लाख रुपयांपासून सुरू होते.

Maruti S-Presso किंमत आणि फीचर्स

मारुती सुझुकी S-Presso ही चांगली कार आहे. ज्याची किंमत 5.91 लाख रुपये आहे. या कारमध्ये 4 लोक व्यवस्थित बसू शकतात. या कारमध्ये 1.0L पेट्रोल इंजिन आहे. ही कार CNG मध्ये देखील उपलब्ध आहे आणि 32.73km/kg चे मायलेज देते, असं कंपनीचं म्हणणं आहे. कारमध्ये अँटी-लॉक ब्रेकिंग सिस्टमसह ईबीडी आणि एअरबॅग्जची सुविधा आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: शिवसेना ठाकरे गटाच्या अखिल चित्रे यांनी मंत्री नितेश राणे यांना डिवचले

BJP National President: भाजपला पहिल्यांदा मिळू शकतात महिला राष्ट्रीय अध्यक्ष, ३ नावं आहेत चर्चेत

Shirdi : साई संस्थानची बदनामी केल्यास फौजदारी गुन्हा दाखल होणार | VIDEO

Sara Tendulkar: सचिन तेंडुकरच्या लाडक्या लेकीचे नविन ग्लॅमरस फोटो तुम्ही पाहिलेत का?

New Electric Bike Launch : बाईक रायडर्ससाठी गुड न्यूज! फक्त २५ पैशांमध्ये १ किमी धावेल ही इलेक्‍ट्रिक टू-व्हीलर, जाणून घ्या किंमत आणि वैशिष्ट्ये

SCROLL FOR NEXT