Majhi Kanya Bhagyashree Yojana  Saam Tv
बिझनेस

लेकीच्या जन्मानंतर ५०,००० मिळणार; १८ वर्षांपर्यंत प्रत्येक महिन्याला जमा होणार पैसे; Majhi Kanya Bhagyashree Yojana चा लाभ कसा घ्यायचा?

Siddhi Hande

केंद्र सरकारने मुलींसाठी अनेक योजना राबवल्या आहेत. केंद्र सरकारसोबतच राज्य सरकारनेही मुलींसाठी खास योजना राबवली आहे. महाराष्ट्र शासनाने माझी कन्या भाग्यश्री योजना राबवली आहे. या योजनेअंतर्गत मुलीच्या जन्मानंतर ५०,००० रुपये दिले जातात.

माझी कन्या भाग्यश्री योजना २०१६ साली सुरु केली होती. मुलींचा जन्मदर वाढावा आणि तसेच त्यांना शिक्षणासाठी आर्थिक मदत मिळावी, या उद्देशातून ही योजना सुरु करण्यात आली आहे. या योजनेत दारिद्र्य रेषेखालील कुटुंबातील मुलींना पैसे दिले जातात. मुलीचा जन्म झाल्यापासून ते ती १८ वर्षाची होईपर्यंत आर्थिक मदत केली जाते.

माझी कन्या भाग्यश्री योजना ही सुकन्या समृद्धी योजनेअंतर्गत सुरु करण्यात आली आहे.सुकन्या समृद्धी योजनेच्या सर्व अटी माझी कन्या भाग्यश्री योजनेत लागू करण्यात आल्या आहेत.

माझी कन्या भाग्यश्री योजनेत लाभ घेण्यासाठी अर्जदार मुलगी महाराष्ट्राची रहिवासी असणे गरजेचे आहे. योजनेत आई आणि मुलीच्या नावाने जॉइंट अकाउंट उघडले जाते. या योजनेत १ लाखांचा अपघात विमा आणि ५००० रुपयांचा ओव्हरड्राफ्ट दिला जातो. दोन मुली असतील तर या योजनेत लाभ घेऊ शकतात. या योजनेत मिळणारे पैसे मुलींच्या शिक्षणासाठी वापरता येतील. या योजनेत मुलींच्या आई वडिलांनी कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया केल्यानंतर हे पैसे मिळणार आहेत.(Majhi Kanya Bhagyashree yojana)

या योजनेत पिवळ्या आणि केशरी रेशन कार्डधारकांना मुलीच्या जन्मानंतर पाच हजार रुपये दिले जातात.मुलगी पहिलीत गेल्यावर सहा हजार रुपये, मुलगी सहावीत गेल्यावर सात हजार रुपये दिले जातात. मुलगी अकरावीत गेल्यावर ८००० रुपये दिले जातेत. मुलीचे वय १८ वर्ष पूर्ण झाल्यानंतर तिला ७५००० रुपये दिले जातात. म्हणजेच मुलीला एकूण १ लाख १ हाजर रुपये दिले जातात.

या योजनेत अर्ज करण्यासाठी तुम्हाला आधार कार्ड, बँक पासबुक, मोबाईल नंबर, पासपोर्ट साइज फोटो, पत्ता या गोष्टी आवश्यक आहे. याचसोबत तुमच्या उत्पन्नाचा दाखलादेखील आवश्यक आहे. या योजनेत एका घरातील फक्त २ मुलींनाच पैसे मिळणार आहे. माझी कन्या भाग्यश्री योजनेत नोंदणी करण्यासाठी महाराष्ट्र सरकारच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या. या वेबसाइटवरुन तुम्हाला योजनेचा फॉर्म डाउनलोड करावा लागेल. त्यानंतर हा फॉर्म महिला व बाल विकास मंत्रालयाकडे जमा करावी लागणार आहे. (Majhi Kanya Bhagyashree yojana Application Process)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

VIDEO : जालन्यात कॉंग्रेसच्या बैठकीत राडा; अंतर्गत वाद चव्हाट्यावर

Akola News : अकोल्यात दोन गटात तुफान राडा; दगडफेक आणि जाळपोळ, हरीपेठ भागात नेमकं काय घडलं?

Marathi News Live Updates : अकोल्यात दोन गटात राडा

Virar Accident : विरारमध्ये भीषण अपघात; भरधाव टेम्पोने चिरडल्याने २ वर्षांच्या चिमुकलीचा जागीच मृत्यू

VIDEO : आचारसंहितेबद्दल अजित पवारांचं मोठं वक्तव्य

SCROLL FOR NEXT