Mumbai Traffic Changes: गणेश विसर्जनासाठी मुंबई सज्ज, कुठले रस्ते बंद, कुठले सुरू? वाचा वाहतुकीचे नियोजन

Alternate Routes for Mumbai Traffic During Ganesh Visarjan: गणपती बाप्पाला मंगळवारी निरोप दिला जाणार आहे. गणेश विसर्जनासाठी पालिका प्रशासनासोबत मुंबई पोलिस देखील सज्ज झाले आहेत. मुंबईतील वाहतुकीमध्ये मोठे बदल करण्यात आले आहेत. कोणते ते वाचा सविस्तर...
Mumbai Traffic Changes: गणेश विसर्जनासाठी मुंबई सज्ज, कुठले रस्ते बंद, कुठले सुरू? वाचा वाहतुकीचे नियोजन
Mumbai Traffic Changes During Ganesh VisarjanSaam Tv
Published On
Traffic Advisory Restrictions & Alternate Routes

१० दिवस बाप्पाची मनोभावाने सेवा केल्यानंतर आता गणेशभक्त १७ सप्टेंबरला म्हणजेच अनंत चतुर्दशीला लाडक्या बाप्पाला निरोप देणार आहेत. सर्व सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या बाप्पाचे देखील मंगळवारी विसर्जन करण्यात येणार आहे. मोठ्या थाटामाटामध्ये बाप्पाला निरोप देण्यासाठी मिरवणुका काढल्या जातात. या मिरवणुकी पाहण्यासाठी आणि बाप्पाला निरोप देण्यासाठी मोठ्यासंख्येने गणेशभक्त घराबाहेर पडतात आणि देशभरातून गणेशभक्त मुंबईत येतात.

अशामध्ये मुंबईतील अनेक रस्त्यांवर मोठी गर्दी होते आणि वर्दळही वाढते. त्यामुळा वाहतुकीवर मोठा परिणाम होत आहे. गणेश विसर्जनासाठी मुंबई वाहतूक पोलिस सज्ज झाले आहेत. गणेश विसर्जनासाठी मुंबई वाहतूक पोलिसांनी वाहतुकीमध्ये मोठे बदल केले आहेत. मुंबईमधील वाहतुकीमध्ये नेमके कोण-कोणते बदल करण्यात आले आहेत ते आपण पाहणार आहोत...

दक्षिण मुंबईमधील वाहतुकीतील बदल -

मरीन ड्राइव्ह -

मरीन ड्राइव्ह येथील एनएस रोडच्या उत्तरेकडील वाहतूक इस्लाम जिमखाना येथून मुंबई कोस्टल रोडकडे वळवली जाईल.

महापालिका मार्ग -

सीएसएमटी जंक्शन ते मेट्रो जंक्शनपर्यंत महापालिका मार्ग आवश्यकता भासल्यास बंद केला जाईल. वाहतूक सीएसएमटी जंक्शनवरून डीएन रोड आणि एलटी मार्गे मेट्रो जंक्शनकडे वळवली जाईल.

जेएसएस रोड -

आल्फ्रेड जंक्शन ते पोर्तुगीज चर्चपर्यंत जेएसएस रोड गरज भासल्यास बंद केला जाईल. वाहतूक काळबादेवी रोड, शामलदास गांधी मार्ग, महर्षी कर्वे रोड मार्गे वळवण्यात येणार आहे.

सरदार वल्लभभाई पटेल रोड -

सरदार वल्लभभाई पटेल रोड गोल देवल ते प्रार्थना समाज जंक्शनपर्यंत वाहतुकीसाठी बंद राहणार आहे.

पी डी'मेलो रोड-

पी डी'मेलो रोड गरज पडल्यास काकली चौक ते वाडी बंदर जंक्शनपर्यंत वाहतुकीसाठी बंद राहिल.

वालकेश्वर रोड -

वाळकेश्वर रस्ता एकेरी होणार. आवश्यकता भासल्यास तीन बत्ती जंक्शनपासून वाहतुकीस बंदी राहिल.

डीबी मार्ग -

डीबी मार्ग नवजीवन जंक्शन ते एम पावेल जंक्शनपर्यंत बंद राहिल.

ताडदेव रोड -

ताडदेव रोड एकेरी होणार. वसंतराव नाईक चौक ते नाना चौकापर्यंत वाहतुकीस बंदी.

बीए रोड नॉर्थ बाऊंड -

बावळा कंपाऊंड जंक्शन ते भारतमाता जंक्शनपर्यंत बीए रोड नॉर्थ बाउंड वाहतुकीसाठी बंद राहणार आहे.

बीए रोड साऊथ बाऊंड -

बीए रोड साऊथ बाऊंड भारतमाता जंक्शन ते बावळा कंपाउंड जंक्शनपर्यंत वाहतुकीसाठी बंद राहणार आहे.

Mumbai Traffic Changes: गणेश विसर्जनासाठी मुंबई सज्ज, कुठले रस्ते बंद, कुठले सुरू? वाचा वाहतुकीचे नियोजन
Ganesh Visarjan 2024 : बाप्पाचे विसर्जन करताना 'या' चुका टाळा; विघ्नहर्ता निराश होऊ शकतो

मध्य मुंबईतील वाहतुकीमधील बदल -

डॉ. एनी बेसेंट रोड -

गरज भासल्यास वरळी नाका जंक्शनवर हाजी अलीकडे दक्षिणेकडील बाजूने वाहतूक करण्यास मनाई असेल.

वीर सावरकर मार्ग -

वीर सावरकर मार्ग एस बँक सिग्नल ते सिद्धविनायक मंदिर जंक्सनपर्यंत वाहतुकीसाठी बंद राहिल.

टी एच कटारिया मार्ग -

कुंभारवाडा जंक्शन- टाटा पॉवर हाऊस- माटुंगा रेल्वे वर्कशॉप, कटारिया पूल- गंगा विहार जंक्शन- शोभा हॉटेल जक्शनच्या दोन्ही बाजू वाहतुकीसाठी बंद राहतील.

टिळक ब्रिज -

दादर टीटी ते कोतवाल गार्डनपर्यंत वाहतूक बंद राहिल.

एलबीएस रोड -

कमानी जंक्शन ते कुर्ला डेपो दरम्यान उत्तरेकडील बाजूने वाहतूक करण्यास मनाई असेल.

Mumbai Traffic Changes: गणेश विसर्जनासाठी मुंबई सज्ज, कुठले रस्ते बंद, कुठले सुरू? वाचा वाहतुकीचे नियोजन
People Drowned During Ganesh Visarjan : गणेश विसर्जनादरम्यान भीषण दुर्घटना; ८ जणांचा नदीत बुडून मृत्यू, कुटुंबांवर शोककळा

मुंबई पूर्व उपनगरातील वाहतुकीमधील बदल -

सायन-पनवेल हायवे आणि घाटकोपर- मानखुर्द लिंक रोड -

सायन-पनवेल हायवे आणि घाटकोपर- मानखुर्द लिंक रोडवर सकाळी ८ ते ११ आणि संध्याकाळी ५ ते ९ या वेळेत अवजड वाहनांना बंदी असेल.

मुलुंडचा डम्पिंग रोड आणि भांडुपचा टँक रोड -

मुलुंडचा डम्पिंग रोड आणि भांडुपचा टँक रोडवरील दोन्ही बाजूची वाहतूक बंद राहिल.

जेव्हीएलआर जंक्शन ते दुर्गानगर -

जोगेश्वरीतील जेव्हीएलआर जंक्शन ते दुर्गानगरच्या दोन्ही बाजू अवजड वाहनांसाठी बंद राहतील.

मुंबई पश्चिम उपनगरातील वाहतुकीमधील बदल -

जुहू तारा रोड -

सांताक्रूझ पोलिस स्टेशन जंक्शन ते हॉटेल जंक्शनपर्यंत वाहतुकीसाठी बंद असेल.

गोखले पूल रोड -

गोखले पूल रोजवर अवजड वाहनांना बंदी असेल.

मार्वे रोड जंक्शन, मालाड -

मार्वे रोड जंक्शन ते मिथ चौकीपर्यंत वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात येणार आहे.

एलटी रोड, बोरिवली -

डॉन बॉस्को स्कूल जंक्शन ते बोरिवली जेटी रोड वाहतुकीसाठी बंद राहणार आहे.

Mumbai Traffic Changes: गणेश विसर्जनासाठी मुंबई सज्ज, कुठले रस्ते बंद, कुठले सुरू? वाचा वाहतुकीचे नियोजन
Ganesh Chaturthi 2025 : पुढच्या वर्षी लाडका बाप्पा लवकर येणार; वाचा २०२५ मधील गणेश चतुर्थीची तारीख

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com