Shocking News: क्षणात होत्याचं नव्हतं झालं! कपडे धुण्यासाठी वॉशिंग मशिनमध्ये हात घातला अन्..., काही सेकंदात तरुणाचा मृत्यू; पाहा VIDEO

Washing Machine Electric Shock Video: वॉशिंग मशीनमधून कपडे धुताना विजेचा जोरदार झटका लागून एका तरुणाचा मृत्यू झाला. ही घटना सोशल मीडियावर व्हायरल झाली असून विद्युत सुरक्षिततेबाबत जागरूकता वाढवते.
Viral Video
Shocking NewsSaam Tv
Published On

आजकाल कपडे धुण्यासाठी इलेक्ट्रिक मशीनचा वापर केला जातो. वॉशिंग मशीनने कपडे धुतल्यास जास्त वेळ लागत नाही. कपडे लवकर धुतले जातात आणि कोरडे होतात. पण याच वॉशिंग मशीनने एका व्यक्तीचा जीव घेतला आहे. सोशल मीडियावर याचाच व्हिडीओ व्हायरल झाला आहे. जो पाहून प्रत्येकाच्याच अंगावर काटा येईल.

वॉशिंग मशीनमध्ये कपडे धुताना एका व्यक्तीला विजेचा झटका लागला. हा झटका इतका तीव्र होता की काही क्षणातच त्याचा मृत्यू झाला. ही घटना अत्यंत दुखदायक आहे. विद्युत उपकरणाचा वापर करताना योग्य काळजी घेणे महत्वाचे आहे.

Viral Video
Pakoda Seller Viral Video: लोकांचे आरोग्य धोक्यात? उकळत्या तेलात टाकल्या प्लास्टिक पिशव्या, स्ट्रीट फूड विक्रेत्याचं नको ते कृत्य

व्हायरल व्हिडीओमध्ये, एक व्यक्ती कपडे धुण्याची तयारी करताना दिसत आहे. वॉशिंग मशीनमध्ये कपडे धुण्यासाठी त्याने डिटर्जंट पावडर घेतली. नंतर मशीन चालू केली. यानंतर त्याने मशीनमध्ये कपडे धुण्यासाठी पाण्याची पातळी तपासली आहे. पण त्याला माहित नव्हते की, मशीनमध्ये आधीच करंट होता.यामुळे पाण्यात हात घालताच त्याला जोरदार विजेचा झटका बसला. त्याचा हात वॉशिंग मशीनमध्ये अडकला आणि काही क्षणातच हा व्यक्ती बेशुद्ध पडला. हे दृश्य पाहून अनेकजण घाबरले आहेत. वेळ कधी कशी येईल हे सांगता येत नाही. घरामध्ये काही वेळापूर्वी कपडे धुण्याची तयारी करत असलेला या व्यक्तीचा क्षणात मृत्यू झाल्याने सोशल मीडियावर हळहळ व्यक्त होत आहे.

विद्यृतउपकरणांचा वापर घातक

विद्यृत उपकरणांमुळे व्यक्तीचा मृत्यू होणे ही घटना काही पहिलीच नाही. अनेकदा व्यक्तींचा विद्यृत उपकरणांमधील विजेचा शॉक लागून मृत्यू झाला आहेत. कोणतेही विद्यृतउपकरणे हाताळताना योग्य ती काळजी घेणे गरजेचे आहे.

Viral Video
Viral Video: मराठीत बोलणार नाही तर महाराष्ट्रात ठेवणार नाही; लोकलमध्ये हिंदीत बोलणाऱ्या तरुणीवर महिला भडकली, VIDEO

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com